पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराजच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन.. पोस्ट शेयर करत दिली बातमी

छोट्या पडद्यावरील ‘ पिंकीचा विजय असो’ मालिकेत युवराजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विजय आंदळकरच्या घरी आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. आणि यामागचे कारण देखील आनंदाचे आहे. त्याच्या घरी एका गोंडस चिमुकलीचं आगमन झालं आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि आणि अभिनेत्री रुपाली आईबाबा झाले आहेत. विजयनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

विजयनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ” बाप झालो..लक्ष्मी घरी आली रे..”अशी आनंदमय पोस्ट शेअर केली. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी अभिनंदन आणि शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट अगदी काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Arun Andalkar (@vijayandalkar)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रूपालीच्या डोहाळे जेवणचं फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री पत्नी रुपाली झणकरने काही महिन्यांपूर्वी आपण आईवडील बनणार असल्याची गुड न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. त्यामुळे चाहते प्रचंड खुश झाले होते. चाहत्यांनी त्यांच्यावर भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला होता. तसेच रुपालीने बेबी बम्पसोबत अनेक सुंदर फोटोशूटदेखील केले होते. अभिनेत्रीने फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान आता अभिनेत्रीने एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे.

रुपाली आणि विजयची भेट झी मराठीवरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ या मालिकेच्या सेटवर झाली. यात रुपालीनं काजोलची तर विजयनं मदनची भूमिका साकारली होती. विजय आंदळकरचं हे दुसरं लग्न आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विजय आणि रुपालीने लग्नगाठ बांधली होती. ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या झी मराठी वरील मालिकेत काम करत असताना अभिनेत्री रुपाली झनकर हिच्याशी त्याचं प्रेम जुळून आलं होतं. मेंदी, हळदीचे फोटो रूपाली आणि विजयने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

रुपाली झनकर हिने लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत काजलची भूमिका साकारली होती. याच दरम्यान त्यांची मैत्री झाली. मालिकेनिमित्त हे सर्व कलाकार नाशिकलाच काही काळ एकत्रित राहिले होते. आणि त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. त्यानंतर २१ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना धक्का दिला होता. कारण विजय आंदळकरचं अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत अगोदरच लग्न झालं होतं. पण आता विजय आणि रुपाली हॅप्पी आई बाबा झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप