फोटोत दिसणारा चिमुकला ओळखला काय?आज गाजवतोय फिल्म इंडस्ट्री, जाणून घ्या कोण आहे तो..
मित्रहो “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” ही म्हण अनेकदा खरी ठरते, यावरून या अनेकांची लहान असताना पाहिलेली गुणे त्यांना मोठे पाणी तेच करिअर म्हणून हाताळावे लागते. कलाविश्वात असे भरपूर कलाकार आहेत ज्यांनी लहानपणापासून ही आवड जपली आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, या फोटोची सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली आहे. यातील हा चिमुकला कोण असावा असा प्रश्न अनेकांना पडला असून लोक याबाबतीत गोंधळात पडले आहेत. पण आज हा गोंधळ कमी होणार असून या चिमुकल्या बद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्याचा बालपणातील फोटो भलताच लक्षवेधी ठरला आहे, यातील हा चिमुकला सध्या मालिका क्षेत्रात आपले नाव कमवत आहे. प्रत्येक वेळी आकर्षक वाटणारा त्याचा लुक आणि भुरळ घालणारा अभिनय लोकप्रिय होत आहे. त्याच्या खूपशा भूमिकांना चाहत्यांची विशेष पसंती मिळाली आहे. मालिकांसह तो चित्रपटात देखील धुमाकूळ घालत असतो. त्याने आपल्या आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या चित्रपट सृष्टीत त्याने पाय रोवला आहे. म्हणून आज एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे.
मित्रहो हा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. त्याने “माझा होशील ना” मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. विराजसचे अनेक फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले आहेतच, तो दिसायला खूपच हँडसम आहे. त्याला बघितल्यावर अनेक तरुणींच्या काळजाचा ठोका चुकतो. “हॉस्टेल डेज” हा त्याचा पहिला चित्रपट आहे, या चित्रपटातील त्याची भूमिका भलतीच लोकप्रिय झाली आहे. “अनाथेमा” या नाटकामध्ये त्याने अभिनय व दिग्दर्शनाचे काम केले आहे. तसेच मृणाल कुलकर्णी यांच्या सोबत “रमा” चित्रपटात सहायक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली आहे.
View this post on Instagram
अभिनेता विराजस याने “डावीकडून चौथी बिल्डिंग” या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे नाटक देखील पडद्यावर विशेष गाजले आहे, यामध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने अभिनय साकारला आहे. विराजस आणि शिवानी या दोघांची या नाटकाच्या वेळी भेट झाली होती. दोघेही आपल्या पहिल्या वहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांची केमिस्ट्री खूपच आकर्षक आहे, या प्रेमकथेच्या अनेक बाजू लोकप्रिय झाल्या आहेत. सोबतच ही जोडी देखील अनेकांना खूप आवडते. एकाच कलाविश्वात कार्यरत असणारे हे दोन हिरे एकत्र आल्याने त्यांच्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच प्रकाश असतो.
बराच काळ या दोघांनी एकमेकांना डेट केले होते, खूप दिवस एकमेकांच्या सानिध्यात घालवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व ते दोघे लग्नबंधनात अडकले. शिवानी कमालीचा अभिनय साकारते, तिने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा” या मालिकेत रमाबाईंचे पात्र पार पाडले होते. तिच्या या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळाली आहे, शिवानी व विराजस नेहमी असेच लोकप्रिय आणि प्रसिद्ध होत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा