फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्या गाजवत आहेत छोटा पडदा…कोण आहेत ओळखलंत का यांना?

0

मराठी टेलिव्हिजनवर अनेक बहीण भावांच्या जोड्या फेमस आहेत. ज्यांचे फोटोज् नेहमी व्हायरल होत असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक गोंडस फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन छोट्या क्यूट मुली दिसून येत आहेत. या दोघी बहिणी असल्याचं ही म्हंटल जात आहे. तुम्ही ओळखलंत का यांना? या बहिणी आज टिव्ही दुनियेत आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावले आहे.

या फोटोत दिसणाऱ्या चिमुकल्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री खुशबू तावडे आहेत. या बहिणी आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. या दोघी बहिणींमधील बॉण्डिंग नेहमीच त्या शेयर करत असतात. त्या दोघीही सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. आणि नेहमी आपले फोटोज शेअर करत असतात. सध्या खुशबू आपल्या पहिल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोबतच तितिक्षासुद्धा मावशी असल्याचा पुरेपूर आनंद लुटत आहे. दरम्यान, खुशबूचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने तितिक्षाने बहिणींसाठी स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तितिक्षा तावडेने इंस्टाग्रामवर खुशबूसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “इतकी वर्षे एकत्र राहिली आणि तरीही तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. निर्भय, शांत आणि स्वप्नाळू असल्याबद्दल धन्यवाद. तुज्या आजूबाजूला आयुष्य खूप सोपे आणि आनंदी झाले आहे. अकल्पनीय वाटणारी स्वप्ने पाहून तू कशी आश्चर्यचकित करते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तुला तुझी स्वप्ने पूर्ण करताना पाहणे हा मला आवडणारा सर्वोत्तम शो आहे. असेच सुरू ठेव ! तू स्टार आहेस. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितिक्षा तावडेने ‘सरस्वती’ मालिकेतून छोटया पडद्यावर आपली जादू केली तर खुशबूनेदेखील मराठी बरोबरच अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘प्यार की एक कहानी’, ‘तेरे लिये’, ‘मेरे साई’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी तर ‘आम्ही दोघी’, ‘भेटशील तू नव्याने’, ‘पारिजात’, ‘देवयानी’ यांसारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच संग्राम साळवीचा स्वतःचा ‘साई वॉक कॅफे’ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तीतिक्षा तावडे ही उत्कृष्ट अभिनेत्री असली तरी ती एक उत्तम चित्रकार देखील आहे. दरम्यान, तिने तिचे काही स्केचेस शेयर केले होते, त्याबद्दल तिने वक्तव्य केले की, “माझ्या बहिणीचे नुकतेच संग्राम साळवी यांच्याशी लग्न झाले आहे आणि ते काल त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या लग्नाच्या छायाचित्रांमधील स्केचेस भेट देऊन आश्चर्यचकित केले.”जेव्हा जेव्हा तितीक्षाला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती ऑनलाइन व्हिडिओ पाहून ही कला शिकण्याचा प्रयत्न करते.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप