मित्रहो क्रिकेटपटू रोहित शर्मा नेहमीच एक लोकप्रिय व्यक्ती राहिली आहे, सोशल मीडियावर अनेक नेटकरी त्याच्या कौतुकाचे गाऱ्हाणे गात असतात. रोहित एक उत्कृष्ट खेळाडू आहे. इंग्लड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात रोहित चांगलाच तल्लीन झालेला पाहायला मिळाला होता. यावेळी जुना फॉर्म दाखवत झंझावाती अर्धशतक ठोकले आणि भारतीय संघाला १८.४ षटकातच १० विकेट्सने हा सामना जिंकून दिला होता. याच सामन्यादरम्यान त्याने एक खास काम केले ज्यामुळे त्याचे अनेकजण विशेष कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर याबाबतीत भरपूर चार रंगलेली आहे.
मित्रहो रोहित अतिशय सुंदर खेळतो, मात्र खेळताना हा चेंडू अनेकदा स्टेडियमच्या बाहेर देखील जातो. लोक अतिशय उत्साहाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तिथं बसलेले असतात. काहीवेळा त्यांच्या जवळ चेंडू जाऊन पोहचतो. तर काहीवेळा त्यांना इजा देखील होते. आज आर्टिकल मध्ये अशीच एक घटना रोहितच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो हा सामना सुरू असतानाच रोहितच्या एका ष षटकाराचा चेंडू स्टेडियम मधील एका छोट्या मुलीला जाऊन लागला. मात्र सामना संपल्यावर रोहितने स्वतः तिच्या जवळ जाऊन तिची आपुलकीने विचारपूस केली होती.
This girl was injured by Rohit’s six.
#RohitSharma #ENGvsIND pic.twitter.com/iPc4H9OYBx— Dinesh Lilawat (@DineshLilawat45) July 13, 2022
त्याची हीच गोष्ट लोकांना अतिशय भावली. भारताच्या डावातील पाचवा षटकादरम्यान रोहितने मारलेल्या षटकारामुळे एका चिमुकलीला दुखापत झाली. षटकातील तिसऱ्या शॉट पिच चेंडूवर रोहितने चांगलाच शॉट मार्ट षटकार खेचला होता. त्याने षटकार मारल्यावर तो वळला आणि नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या धवनकडे जाऊ लागला. मात्र त्यावेळी कॅमेरामन ने सीमारेषेपर्यंत त्याचा पाठलाग केला होता. पण हा चेंडू सीमारेषेबाहेर गेला व स्टेडियम मध्ये बसलेल्या दर्शकांच्यात जाऊन पोहचला.
तिथे सामना पाहत बसलेल्या, एका चिमुकलीला या चेंडूने जखम दिली. खूपच जोरात हा चेंडू तिला मारला गेला त्यामुळे ती वेदनेने विव्हळली व रडू लागली. त्यावेळी तिच्या जवळ बसलेल्या लोकांनी तिला जवळ घेतले व शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सर्व खेळाडू व रोहित सुद्धा मैदानावर उभे राहून हा प्रसंग पाहत होते. हा सामना चालू असताना त्या मुलीची भेट घेणे रोहितला शक्य न्हवतेच, मात्र तरीही सामना संपल्यावर त्याने आठवणीने तिची भेट घेतली व आपुलकीने विचारपूस केली. तिचे नाव मीरा साल्वी असून, चेंडू तिला पाठीवर लागला होता.
रोहित तिला भेटायला जाताना काही चॉकलेट आणि टेडी बियर घेऊन गेला होता. त्याची ही भेट सोशल मीडियावर खूपच कौतुकास्पद ठरली आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला ते लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.