मित्रहो झी मराठी वाहिनीवरील मालिका माझी तुझी रेशीमगाठ आता एका खास वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेतील सर्व अतरंगी पात्रे रसिक मंडळींचे लक्ष वेधून घेण्यात चांगलेच पारंगत असल्याने या मालिकेवरून नजर हटवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मालिकेतील काही खास गोष्टी प्रचंड आकर्षित करत आहेत शिवाय परीचे नवीन घर व नेहाचे सासर म्हणून यशची दुनिया नव्याने रंगली आहे. त्यामुळे या तिघांचे नवीन कुटुंब पाहताना प्रेक्षकांना आणखीन हौस वाटत आहे. पुढे यामध्ये काय होईल ते पाहण्यासाठी आता उत्सुकता शिगेला पोहचत आहे.
ही उत्सुकता शिगेला पोहचत असतानाच दरम्यान यशच्या नेहाने साडी नेसून काही फोटो शूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही आहे, या मालिकेत यशच्या भूमिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आहे. मालिकेत यश आणि नेहाचा नुकताच लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा प्रेक्षकांच्या घोळक्यात सुद्धा आवर्जून होतीच.
लग्नानंतर आता नेहाचा नवा लुक समोर येत आहे, यामध्ये तिने निळ्या रंगांची साडी परिधान केलेली आहे. या साडीला शोभेल असाच नाजूक नेकलेस देखील तिने घातला आहे. त्यामुळे साडी आणि हा नेकलेस सोबतच प्रार्थना बेहरेची नैसर्गिक सुंदरता वातावरण कडक बनवत आहेत. व्हायरल होत असलेले फोटो कोणालाही घायाळ करतील असेच आहेत, तिची बाजूक स्माईल आणि फोटोतील जीवघेणा अंदाज डोळ्यातून खूप काही सांगत आहे. तिच्या चेहऱ्यावर झळकत असलेला ग्लो रसिकांच्या मनाला प्रचंड भावला आहे म्हणूनच तर तिच्या या फोटोवर अनेक कमेन्ट येत आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच कोणत्या कोणत्या कारणातून चर्चेत येत असते, आजवर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे मात्र “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. तिच्या निरागस सौंदर्याचे व अप्रतिम अभिनयाचे इथे देखील खूप कौतुक झाले. तसेच या मालिकेत श्रेयस सोबतची तिची जोडी खूप छान दिसते, त्या दोघांचीही लोकप्रियता दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. श्रेयस हा देखील एक मराठमोळा अभिनेता असून त्याने देखील आजवर अनेक चित्रपटात खूप सुंदर काम केले आहे. त्याचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असतो.
“माझी तुझी रेशीमगाठ” मालिका दिवसेंदिवस आणखीन खुलत आहे, त्यामुळे यातील सर्व पात्र आता मुख्य वाटत आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःची भूमिका इतकी सुंदर निभावली आहे की प्रत्येकजण मालिकेचा कणा आहे असे वाटते. शिवाय छोटी परी देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात मागे पडत नाही. तिच्या गोड बोली मुळे रसिक मंडळी ही मालिका आणखीन मन लावून पाहतात. या मालिकेला असेच यश मिळो व यश आणि नेहाची जोडी आणखीन लोकप्रिय होवो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.