पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरचा भावूक व्हिडियो झाला व्हायरल.. सर्वांना प्रार्थना करण्याची केली विनंती.

0

क्रिकेटविश्वात रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर मधून निवृत्त झाला असला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असतो. रविवारी शोएबने सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचा एक इमोशनल व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामुळे त्याचे फॅन्स काळजीत पडले आहेत. शोएब या व्हिडिओ मध्ये हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसतो. शोएब गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करुन घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे गेला आहे. त्याने तिथून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकृतीबद्दल माहिती दिली. लवकरात लवकर आपल्याला बरं वाटावं, यातून बाहेर पडता यावं, यासाठी शोएबने चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

जवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येमुळेच त्याचे करिअर खूप लवकर संपले अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. अन्यथा आणखी चार ते पाच वर्ष तो व्यवस्थित क्रिकेट खेळू शकला असता अशी त्याला खात्री होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे.

या व्हिडीओमध्ये आपण शोएबला भावुक झालेला पाहू शकतो. त्याच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “मी आणखी चार ते पाच वर्ष खेळू शकलो असतो. मात्र, मला हे ठाऊक होते की मी जास्त खेळलो तर मी लवकरच व्हीलचेअरवर येऊ शकतो. या कारणामुळेच मी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

शोएब अख्तरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तिथे त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. याआधी सुद्धा त्याच्यावर अशाच पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही शेवटची शस्त्रक्रिया ठरावी, अशी त्याची अपेक्षा आहे. “सध्या मला वेदना होत आहेत. तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. ही माझ्यावर शेवटची शस्त्रक्रिया असावी, अशी मी अपेक्षा करतो”, असं शोएब या व्हिडिओ मध्ये म्हणाला. देशाच पाकिस्तानच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं.

पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. शोएबच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान गोलंदाजीचा विक्रम नोंद आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४ टी-20, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले. त्‍याच्‍या नावावर टी-20 मध्‍ये २१, एकदिवसीयमध्‍ये २४७ विकेट आणि कसोटीमध्‍ये १७८ विकेट आहेत. आता तो लवकरात लवकर बरी व्हावा हीच सदिच्छा..

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप