‘रोहितला परत आणा’, म्हणत चाहत्याचा थेट मालक अंबानीलाच प्रश्न; आकाश म्हणाला, ‘चिंता नको करू, तो…। owner Ambani

owner Ambani आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024 Auction) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani) यांना एका चाहत्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचे आकाश यांनी समंजस्यपणे उत्तर दिले. याविषयी सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत.

 

काय होता प्रश्न आणि काय म्हणाले अंबानी?
खरं तर, माध्यमांशी बोलताना एका व्यक्तीने थेट रोहित शर्माविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला की, “रोहितला परत आणा.” या व्यक्तीचा प्रश्न ऐकताच आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया देत मजेशीर अंदाजात म्हटले की, “चिंता करू नका तो फलंदाजी करेल.”

खरं तर, मुंबई इंडियन्सनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षावही करत आहेत. एकाने लिहिले की, “यावरू स्पष्ट होते की, रोहित मुंबईसाठी खेळेल. ट्रेड होणार नाही.” आणखी एकाने कमेंट केली, “धन्यवाद देवा, तो असे म्हणाला नाही की, रोहित वॉटर बॉय बनेल.” एक तर असेही म्हणाला की, “आणि नेतृत्व करून हार्दिक हरवेल?”

मुंबईची खरेदी
आयपीएल 2024 मिनी लिलावात (IPL 2024 Mini Auction) मुंबईने एकूण 8 खेळाडूंना खरेदी केले. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याला मुंबईने सर्वाधिक 5 कोटी दिले. लिलावात मुंबईने गेराल्डव्यतिरिक्त, नुवान तुषारा (4.8 कोटी), दिलशान मदुशंका (4.6 कोटी), मोहम्मद नबी (1.50 कोटी), श्रेयस गोपाळ (20 लाख), नमन धीर (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख) आणि शिवालिक शर्मा (20 लाख) या खेळाडूंना संघाचा भाग बनवले.

Leave a Comment

Close Visit uttamsheti