ओंकार भोजने ने घेतली महाराष्ट्राची हास्य जत्रा शो मधून एक्झिट.. या पॉप्युलर शोमध्ये दिसून येणार..
हास्याचा फवारा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा हे समीकरण या शोने सार्थ केले आहे. प्रेक्षकांना अगदी लोटपोटकरण्यात या शोचा हाथ पकडणे म्हणजे महाकठीण काम.. या शोमध्ये कार्यरत अनेक कलाकारांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. आणि असाच एक कलाकार म्हणजे ओंकार भोजने.. आपल्या अनोख्या शैलीने सर्वांना हसवण्यात त्याने बाजी मारली आहे. त्याचा अग अग आई हा डायलॉग ऐकताच चाहते पोट धरून हसायला लागतात. काही चाहते तर केवळ त्याच्यासाठीच हा कार्यक्रम पाहतात. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अनेक वर्षापासून आपल्या कॉमिक टायमिंग ने हसवून हसवून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदारने काही महिन्यांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यानंतर आता खुद्द ओंकार भोजने या कार्यक्रमातून एक्झिट घेणार आहे. त्यामुळे चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे.
कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते. त्याने त्याच्या विनोदी अभिनय शैलीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र आता लवकरच ओंकार हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोधून तो अचानकपणे निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. तो लवकरच झी मराठीवरील ‘फूबाईफू’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. त्याचा एक प्रोमोही सध्या व्हायरल होत आहे.
वैयक्तिक कारणं आणि सिनेमांच्या चित्रीकरणासाठी ओंकारने ‘हास्यजत्रे’तून शॉर्ट ब्रेक घेतला होता. त्यानंतर पुन्हा तो हास्यजत्रेत परतणार होता; पण निर्मिती संस्थेला न कळवता त्याने थेट दुसऱ्या वाहिनीवरील शो स्वीकारल्याचं समोर आलंय. काल ‘फू बाई फू’चा नवीन प्रोमो आल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं.
विशेष म्हणजे हा प्रोमो सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सामन्यावर यातून बोट ठेवण्यात आलं आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही भूमिका ओंकारनेच साकारल्या आहेत. शिंदेंचा हुबेहूब गेटअप ओंकारने केला आहे.
त्याच्या या भूमिकेवर नेटकरी देखील खुश आहेत. तर काही नाराज आहेत. आणि अनेकांनी यावर कॉमेंट्स चा पाऊस पाडला आहे यावर एक युजर म्हणतोय की, “दुसर्याने शोधलेला talent चोरलं तुम्ही, Sony ने omkar ला संधी देऊन मोठं केलं, त्याची popularity आणि talent चा तुम्ही मलिदा खाणार”, तर “MHJ चा एकनाथ” असं म्हणत एकाने “नशीब एकलाच गेला… नमा आणि प्रसाद नेलं असतं तर … अग अग आई करत बसले असते… बघा नेत्यांनो तुमची लक्षणं Actor मध्ये पण दिसायला लागली” अशा प्रकारच्या कॉमेंट्स पहायला मिळत आहेत.