माझी तुझी रेशीम गाठ मालिकेत रेवतीची भूमिका साकारणारी नुपूर आहे या दिग्गज कलाकारांची लेक..

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने आपल्या रंजक कथेने प्रेक्षकाना खिळवून ठेवले आहे.मालिकेत सध्या एकीकडे नेहाला सर्व आठवून ती परत यावी यासाठी यश आपला सगळा जोर लावत आहे, पण दुसरीकडे सिम्मी काकू परीची डान्स टीचर रेवतीला आपली सून बनवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान,सिम्मीने रेवतीला यशबरोबर लग्न करण्यासाठी दाखवले आहे, त्यामुळे रेवतीनेदेखील सिम्मीचा प्रस्ताव स्वीकारला आहे.. आणि सध्या रेवती चौधरींच्या पॅलेसमध्ये राहून परीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व ट्विस्ट मुळे रेवती नेहाची जागा घेणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे.

पण मालिकेत रेवतीची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकर तुम्हाला या खास गोष्टी माहीत आहेत का? चला तर जाणून घ्या..

नुपूर दैठणकरने झी मराठीच्याच बाजी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या ऐतिहासिक मालिकेत तिने हिराची प्रमुख भूमिका साकारली होती.या घटनेविषयी नुपूर म्हणाली, ही भूमिका एका धाडसी मुलीची आहे. ही काल्पनिक कथा आहे. यात बाजी व हिराची प्रेमकथा दाखवली आहे. यातील प्रत्येक पात्राला वेगवेगळे कंगोरे आहेत. यात मी लावण्यवती, धाडसी, जिद्दी स्वराज्याच रक्षण करण्यास मागेपुढे न पाहणारी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी दाखवली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे.

दरम्यान, या पात्रासारखीच ती ही जिद्दी आणि धाडशी आहे.. तिचे आई वडील दोघेही कलाक्षेत्राशी निगडित आहेत. तिला लहानपणापासूनच कलेचा वारसा आहे कारण तिचे वडील धनंजय दैठणकर हे सुप्रसिद्ध तबला वादक तसेच संतूर वादक आहेत. तर नुपुरच्या आई डॉ स्वाती दैठणकर या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहेत. सर्वदूर भरतनाट्यमचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न करत आपले योगदान दिले आहे. त्यांनी फक्त देशभरातच नाही तर अगदी साता समुद्रापार आपल्या कलेच्या जोरावर मोठमोठे कार्यक्रम सादर केले आहेत.

यासोबतच नुपूरनाद या नृत्यालयाची त्यांनी स्थापना केली असून यात देश विदेशातील अनेक कलाकारांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. मराठी सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी त्यांच्या नृत्यालयातून भरतनाट्यमचे धडे गिरविले आहेत.आपले पहिले गुरू हे आपले आईवडीलच आहेत ही नुपूरसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. बालपणापासूनच नुपुरने नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.अभिनव विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासोबतच नुपुरने नृत्यामध्ये विशारद आणि अलंकार पदवी प्राप्त केली आहे. नालंदा नृत्यालयातून तिने मास्टर्सची डिग्री मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nupur Daithankar-Bag (@nupur_daithankar)

नुपुरनाद या त्यांच्या डान्स अकादमीचा विस्तार वाढला आहे. त्याची जबाबदारी या दोघी मायलेकींनी समर्थपणे पेलली आहे.सौरभ बाग सोबत नुपूरचे लग्न झाले असून त्यांना रेयांश हा गोंडस मुलगा देखील आहे. आपल्या कलेला वाव मिळावा अशी भूमिका तिच्या वाट्याला आल्याने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेसाठी तिने आपला होकार कळवला.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप