नागा चैतन्यची आणखी एक लव्हस्टोरी सुरू? सामंथाशी घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्रीला आता करतोय डेट…

मित्रहो प्रेमात पडायला कधीही वेळ लागत नाही किंवा त्यासाठी सौंदर्य, धर्म शिवाय वय आणि पात्रता यांसारख्या कोणत्याच गोष्ट गरजेच्या नसतात.फक्त आपण ज्यांच्या प्रेमात पडतो त्यांचा आपण स्वभाव पाहतो, आणि तो जर आपणाला भावला तर आपण त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. मात्र ही प्रेमाची व्याख्या आता नवखीच होत असून प्रत्येक पुन्हा पुन्हा नव्याने नवीन व्यक्तीच्या सहज प्रेमात पडतो. आपण सोशल मीडियावर सक्रिय असतोच त्यामुळे तुम्हाला देखील माहीत असेलच की दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील गाजलेली जोडी अभिनेत्री सामंथा आणि अभिनेता नागा चैतन्य हे दोघेही खुप लोकप्रिय आहेत.

या दोघांनी पती पत्नी या नात्याने आयुष्याला सुरुवात केली होती, मात्र नियतीच्या म्हणण्यानुसार आता यांनी घटस्फोट देखील घेतला असून आपापले आयुष्य स्वतंत्रपणे जगत आहेत. यांच्या घटस्फोटमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता, पण आता हे दोघेही स्वतंत्र झाले असून हे दोघेही आता कोणाला डेट करत असतील याकडे अनेकांचे लक्ष आहे. दोघांनीही त्यांची पर्सनल लाईफ, आणि प्रोफेशनल लाईफ नव्याने सुरु केली आहे. त्यांच्या लाईफ मध्ये खूप काही नवीन बदल झाले असून त्यांच्या साठी देखील हे सगळं नवीनच आहे किंवा मग जिथे थांबले होते तिथेच पुन्हा आलेत असे देखील वाटत असेल.

सोशल मीडियावर यांची चर्चा सुरू असतानाच नागा चैतन्य लक्ष वेधून घेत आहे. रिपोर्ट्स नुसार आता नागा “मेड इन हेवन” फेम शोभिता धुलीपाला हिच्या सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा असाही प्रश्न आहे की नागा पुन्हा एकदा प्रेमात पडला ? इतकेच नाहीतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. नागा चैतन्य याला आपल्या खाजगी जीवनाविषयी मीडिया समोर काहीही बोलायला आवडत नाही. मात्र तरीही सोशल मीडियामुळे नेहमीच सर्वकाही स्पष्ट दिसून येत असून नागा सामंथा पासून वेगळे झाल्यावर आता पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे कळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita Dhulipala (@sobhitad)

नागा चैतन्य आणि शोभिता हे दोघेही एकमेकांसोबत असताना खूप खुश असतात हे जाणवत आहे, दोघांनीही एकमेकांची सोबत खूप आवडते. इतकंच नव्हे तर अभिनेत्याने हैदराबाद मध्ये ज्यूबली हेल्समध्ये एक नवीन घर विकत घेतले आहे. त्या घराचे काम अजून सुरू आहे, त्यावेळी तिथे हे दोघे एकत्र दिसले होते. शिवाय नागाच्या घरी त्यांनी क्वालिटी टाईम देखील घालवला होता. दोघेही एकत्र दिसून आल्याने त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधाण आले आहे. नागाचे सर्व चाहते ही चर्चा आणखीन रंगवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sobhita Dhulipala (@sobhitad)

नागाने पुन्हा एकदा भूतकाळ मागे सारून आयुष्याला एक नवी सुरुवात केल्याने त्याचे सर्व चाहते खूप खुश आहेत. नागा चैतन्य आणि सामंथा यांनी २०२१ मध्ये लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानंतर ऑक्टोबर मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी दोघांमधील मैत्री कायम राहील असेही सांगितले होते. पण अजूनही घटस्फोटामागील कारण त्यांनी जाहीर केले नाही. त्यांची जोडी मात्र अनेकांना खुप आवडते, त्या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप