अभिनेता संकर्षण कऱ्हाडे साठीची नेहा अर्थात प्रार्थनाची ती खास पोस्ट होतेय व्हायरल…
छोटया पडद्यावरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील यश नेहा आणि परी यांच्या व्यतिरिक्त आणखी एक लोकप्रिय आणि चाहत्यांचे लाडके पात्र म्हणजे समीर.. अर्थात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत दिलखुलास आणि बोलका अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण सध्या तो त्याच्या अनेक प्रोजेक्ट्स मुळे नेहमी व्यस्त असतो.
दरम्यान, अलीकडेच त्याचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडण्यात आला. सर्व कलाकार आणि चाहत्यांनी त्याच्यासाठी काहीना काही खास पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या. याचवेळी ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं त्याच्यासाठी खास पोस्ट शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तिची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल देखील झाली.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसोबतचा आठवणीतला एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या अगदी खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये दोघांचा खातानाचा फोटो शेअर केला असून फोटोसोबत एक आकर्षक असे कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये प्रार्थना म्हणते आहे की, ‘आठवतंय का…दोन मित्र एकाच ताटात खाणार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर संकर्षण कऱ्हाडे.’
संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांसोबत कनेक्ट राहतो. तो त्याचे अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतो. वाढदिवशी चाहत्यांनी त्याच्यावर खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान, संकर्षण अनेक मालिका, नाटक, रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या लंडनला सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याच्या बरोबर प्राजक्ता माळी, आलोक राजवाडे, वैभव तत्त्ववादी, ऋषिकेश जोशी अशी कलाकारांची फौज आहे. सगळेच जण धमाल करत शूटिंग करत आहेत आणि तिथल्या गमती जमती ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही चांगला मिळतोय.
गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीर ही भूमिका खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेतून संकर्षण पाच वर्षांनी मालिकेविश्वात परतला होता. या मालिकेपूर्वी ‘देवा शपथ’मध्ये मुख्य भूमिकेत संकर्षण दिसला होता. यंदा मालिकेसोबतच तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात अभिनय करत आहे. तो एक अष्टपैलू कलाकार म्हणून लोकप्रियता मिळवतो आहे.