‘नसीब अपना अपना’ या सिनेमामध्ये विचित्र हेअर स्टाईल ठेवणारी चंदो लक्षात आहे का? रियल लाईफ मध्ये दिसते कमालीची ग्लॅमरस!

0

१९८६ साली प्रदर्शित झालेला ‘नसीब अपना अपना’ हा सिनेमा खूप जणांना आठवत असेल. यामध्ये ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका होती आणि हा सिनेमा त्यावेळी विशेष गाजला देखील होता! ‘नसीब अपना अपना’ या सिनेमातून राधिका कुमार चंदोची गावंढळ भूमिका साकारत झळकल्या होत्या.

या सिनेमामध्ये ऋषी कपूर सोबत अभिनेत्री राधिका कुमार या सहअभिनेत्रीच्या महत्त्व पूर्ण भूमिकेत झळकलेल्या. तर अभिनेत्री फराह नाज यांची देखील मुख्य कलाकार म्हणून यात भूमिका होती. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या चंदो या पात्रामुळे त्या सिनेसृष्टीत विशेष प्रसिद्धीत आलेल्या.

‘नसीब अपना अपना’ या सिनेमामध्ये चंदो म्हणजेच अभिनेत्री राधिका कुमार यांनी केलेल्या वेगळ्या आणि हटके हेअर स्टाईलमुळे आणि संवाद फेकीच्या कौशल्यामुळे ही भूमिका लोकप्रियतेस पात्र ठरली होती. त्यामुळे आता इतक्या वर्षानंतर सध्या हे हटके अभिनेत्री काय करत असेल? कशी दिसत असेल?असे विविध प्रश्न आपल्या नेटकऱ्यांना पडलेले आहेत. चला तर मग या लेखातून अभिनेत्री राधिका कुमार यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊयात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radikaa Sarathkumar (@radikaasarathkumar)

दक्षिणात्य कला विश्वातील राधिका कुमार या लोकप्रिय अभिनेत्री असून आतापर्यंत त्यांनी विविध चित्रपटांमध्ये गाजलेल्या भूमिका निभावल्या आहेत. चंदेरी
दुनियेप्रमाणेच राधिका कुमार सोशल मीडियावरही सक्रिय असतात आणि कायमच आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहतात. आज राधिका कुमार या ५९ वर्षाच्या आहेत, मात्र या वयातही त्या प्रचंड ग्लॅमरस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या खऱ्या आयुष्यात देखील राधिका कुमार या प्रचंड सुंदर दिसत असून आजही त्यांचे असंख्य फॅन फॉलोवर्स आहेत!

राधिका कुमार अनेकदा कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जातात, त्यामुळे तेथील अनेक वेगवेगळ्या लुक मधील फोटो त्यांनी आपल्या इन्स्टा हँडल वरून शेअर केलेले आहेत. त्यांच्या या ग्लॅमरस लुक मुळे राधिका यांच्याकडे पाहिल्यावर त्या चक्क ५९ वर्षाच्या आहेत हे कोणालाही खरं वाटणारच नाही एवढं नक्की!

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप