बिग बॉस सीजन ४ मधील सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे पाहिलीत का तुम्ही? पाहा तुमच्या आवडत्या कलाकाराचे नाव आहे का यात?
काही वर्षांपूर्वी कलर्स टीव्ही वरील हिंदी बिग बॉसचा दबदबा सगळीकडे पाहायला मिळत होता. याच पार्श्वभूमीवर मराठी कलर्स वाहिनीवर देखील मराठी बिग बॉस सुरू करण्यात आले आणि त्याला देखील प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद देखील लाभला! दरवेळी टीआरपी खेचण्यात तितकाच यशस्वी ठरणारा बिग बॉस हा कार्यक्रम कायमच वादग्रस्त ठरतो आणि आता लवकरच याचा चौथा सीजनही सुरू होणार आहे. दर वेळेस या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागलेली असते आणि या वेळेस या सीझनमध्ये आपल्याला कोणते कलाकार बघायला मिळणार याची एक लिस्ट समोर आलेली आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की या कार्यक्रमांमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत ते!
गेल्या वर्षी झालेल्या बिग बॉसच्या सीजन थ्री च्या भरघोस यशानंतर आता सीजन फोर कधी येणार? याबाबत सर्व प्रेक्षकांना प्रश्न पडला होता. चला तर मग या लेखातील जाणून घेऊया या कार्यक्रमामध्ये कोणकोणते मराठी कलाकार सहभागी होऊ शकतात ते.
यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला कलाकार म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेम राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेता किरण माने हे आहेत दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, नेहा खान आहे पाचव्या क्रमांकावर, सहाव्या क्रमांकावर अलका कुबल यांचा नंबर लागलेला आहे, तर सातव्या क्रमांकावर आहे सोनल पवार! तर नवव्या क्रमांकावर आहे शर्वरी लोकरे, ओम प्रकाश शिंदे आहेत दहाव्या क्रमांकावर, तर अकराव्या क्रमांकावर आहे दीप्ती लेले, बाराव्या क्रमांकावर आहे अनिकेत विश्वासराव आणि तेराव्या क्रमांकावर आहेत निखिल चव्हाण, चौदाव्या क्रमांकावर आहे यशोमान आपटे, तर पंधराव्या क्रमांकावर आहे माधव अभ्यंकर, आणि अखेरीस सोळाव्या क्रमांकावर कार्तिकी गायकवाड आहे.
हा सीजन सुरु होण्याच्या आधी या १६ कलाकारांची नावे समोर आली आहेत. हे सर्व कलाकार बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजन मध्ये सहभाग होऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी ही एक कच्ची यादी आहे असे आपण समजू शकतो.
बिग बॉस मराठी सीजन थ्रीचा शेवटचा विनर हा विशाल निकम ठरलेला. त्यावेळी शेवटचा क्षणापर्यंत तीनही स्पर्धकांमधली स्पर्धा अगदी चुरशीची ठरलेली! यावेळी देखील चौथा सीजन देखील तितकाच वादग्रस्त आणि टीआरपी खेचणारा होणार आहे का? हे पाहणे बिगबॉस प्रेमींसाठी तितकेच उत्कंठावर्धक ठरणार आहे!