काकाच्या लग्नात मायराचा थाट.. फोटोज् झाले सोशल मीडियावर व्हायरल..
सध्या सोशल मीडियावर अनेक बालकलाकार आपल्या निरागस अभिनयाने चाहत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. चिमुकल्या वयात जिथे हातात पेन्सिल कशी पकडावी हे कळत नसत त्या वयात हे लोक आपल्या चाहत्यांना भुरळ पाडण्याचे काम करत आहेत. याच प्रसिद्ध बालकलाकारांपैकी एक म्हणजे मायरा वायकुळ..
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून ती आज घराघरात पोहोचली आहे. सध्या मायरा नाहीतर परी म्हणूनच ती सर्वत्र ओळखली जाऊ लागली आहे. तीने तिच्या गोंडस अभिनयाने सगळ्यांच्या मनात स्थान पक्के केले आहे. काही जण तर फक्त तिला पाहण्यासाठी ही मालिका बघतात असे विधान करतात.
मायरा वायकुळ ही सोशल मीडिया स्टार आहे. तिचे युट्यूब चॅनल मायाराज वर्ल्डचे मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती मालिका आणि युट्यूब चॅनल या दोन्हींच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली असते. शिवाय ती नेहमी तिचे डान्स आणि फनी व्हिडिओज चे व्हिडिओज इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईटवर टाकत असते जे काही वेळातच व्हायरल होतात. शिवाय ती माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील अनेक कलाकारांसोबतचे व्हिडिओज शेयर करत असते.
मालिकेच्या सुरुवातीच्या काळात तिचे आणि समीरचे अर्थात संकर्षणचे व्हिडिओज चांगलेच व्हायरल झाले होते जे चाहत्यांना फार आवडले देखील होते. मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे, अशातच परीनं मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. प्रेक्षक तिला मिस करत आहेत. मायराच्या या ब्रेक घेण्यामागचे खरं कारण समोर आलं आहे.
View this post on Instagram
नुकताच मायराच्या काकाच्या लग्नाला गेली आहे. आणि लग्नासाठी परिधान केलेल्या वेशात मायराने तिचे काही क्यूट फोटोज् देखील सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत गोड दिसत आहेत. तीने केलेला हा ट्रॅडिशनल लूक पाहून सर्वजण खूप खुश आहेत. मायराने यावेळी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, सोबतच हातात हिरव्या बांगड्या सुद्धा घातल्या आहेत.
काकाच्या लग्नात मायराचा वेगळाच थाट पाहायला मिळाला.मायरा खूप छान तयार झाली आहे. मायरानं फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत.ज्यात तिनं काकाच्या लग्नासाठी खास हातभर मेहंदी काढली आहे.मायराला या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे.
View this post on Instagram
लग्नासाठी मायरानं खास डिझाइनर आऊटफिटही चॉइस केलाय. मायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांना आवडत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.