भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या चिमुकल्या परीची आईदेखील आहे भन्नाट सुंदरी.. फोटोज् पाहून नेटकरी झाले थक्क..

0

छोट्या पडद्यावर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ काही दिवसांतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत दाखवण्यात येणारी कथा, मालिकेतील अनुभवी कलाकार, उत्कृष्ट छायाचित्रण यामुळे मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक बनली आहे. मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांसारखे लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत असल्याने प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्सुकता यापूर्वीच प्रचंड वाढली होती आणि ती उत्सुकता कायम ठेवत प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात मालिका यशस्वी ठरत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकुळ सोशल मीडियावर सक्रीय असते.मायराचं युट्यूब चॅनेलही आहे. जे तिचे आई बाबा हँडल करत असतात. मायराचे क्यूट व्लॉग्स त्यावर पाहायला मिळतात.,मायराच्या प्रवासात तिच्या आई वडिलांची खूप मेहनत आहेत.स्टायलिंग आणि फोटो पोझेसमध्ये दोघी एकमेकींना टक्कर देत असतात.स्पेशल प्रोग्रामसाठी मायरा आणि तिची आई श्वेता वायकुळ ट्विनिंग स्टाइलमध्ये दिसतात. दोघींचे फक्त आऊटफिट्सच नाही तर फोटो पोझेसही हटके असतात.श्वेता आणि मायरा या क्यूट मायलेकीची जोडी आणि त्याच्या पोझेस, आऊटफिट्सना सोशल मीडियावर पसंती मिळत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

चिमुकली मायरा सध्या तिच्या वागण्या बोलण्याच्या अंदाजाने प्रत्येकालाच थक्क करत असते. ही चिमुरडी मुलगी भल्याभल्यांना पुरून उरेल अशी कामगिरी करताना दिसते. मायरा आता फक्त ५ वर्षांची आहे पण भल्याभल्यांना जमणार नाही असा अभिनय ती करताना दिसते. तिचं स्वतःचं इन्स्टाग्राम अकाउंट असून तिला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. तिच्या सोशल मीडियावर ती ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवताना दिसते. अवघ्या पाच वर्षांची असलेली मायरा सध्या एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाहीये. तिने मागे चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. आपल्या नाजूक हालचालींनी आणि क्युटनेसने तिने चाहत्यांना भुरळ पाडली होती. सध्या तिच्या कामाचं आणि तिच्या या गोड अंदाजाचं खूप कौतुक होताना दिसत असतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

मायरा सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत वास्तव्यास आहे. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपली लाडकी लेक काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले. ह्यामुळेच तिला हि मालिका मिळालीय अशी चर्चा आहे. पण तिचा अभिनय पाहता ती एक उत्तम अभिनेत्री आहे असं लक्षात येत. तिची निरागसता आणि बोलण्याची स्टाईलवर प्रेक्षक फिदा झालेले पाहायला मिळतायेत.

Leave A Reply

Your email address will not be published.