एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी भर पावसात गड चढली मायरा वायकुळ! सोशल मीडियावर व्हिडिओ होत आहे व्हायरल!

सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका टीआरपी खेचण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. यातीलच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अवघ्या महाराष्ट्राची लाडकी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ! तुझी माझी रेशीमगाठ या मालिकेत काम करण्याआधी मायरा सोशल मीडियावरील स्टार होती. युट्युब वरती तिचे ‘मायराज कॉर्नर’ या चैनल वर तिथे वेगवेगळे ब्लॉगचे व्हिडिओ सगळ्यांना पाहायला मिळत असतात.

 

या मालिकेतून पदार्पण केल्यानंतर आपल्या निरागस अभिनयाने तिने सर्व प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेच्या भरपूर बिझी शेड्युल मधून देखील आपल्या आई-बाबांसोबत मायरा वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करताना दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वीच मायरा आपल्या काकाच्या लग्नासाठी म्हणून बाहेर गेली होती, त्यावेळी तिचे तिथे काढलेले धम्माल ब्लॉग व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाले होते. याच दरम्यान सोशल मीडिया वरती मायराचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात भर पावसात चिमुकली मायरा देवीचे दर्शन घ्यायला निघाली आहे. तिच्या या व्हिडिओला फॅन्सची भरपूर पसंती मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

दरम्यान या चिमुकल्या मायराचं ‘माझा देव बाप्पा’ हे नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र त्याआधीच लोणावळ्याच्या एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी मायरा गडावर जाऊन पोहोचली आहे. कार्ले डोंगरावरचा शूट केलेला मायराचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर आलेला आहे. यात मायरा एकविरा आईच्या गडाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे, एवढेच नाही तर मंदिराच्या माथ्यावर पोहोचताच मायराने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वेगवेगळ्या ट्रेंडी पोज देत त्याचा एक नवीन व्हिडिओ देखील शेअर केला आहे! ज्या व्हिडिओमध्ये मायरा फक्त हात वर घेऊन नमस्कार करताना दिसत आहे. मायराचा हा व्हिडिओ देखील तिच्या इतर व्हिडिओज प्रमाणे भरपूरच व्हायरल झाला आहे!

यावेळी मायरानं एकविरा देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन थेट देवीच्या पायावरच डोकं टेकवले. यात मायराचे आई-वडील देखील देवीचं मनोभावे दर्शन घेताना दिसत आहे. त्या तिघांचही हे बाँडींग पाहून सोशल मीडियावर मायराच्या चाहत्यांनी या तिघांवरही भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे!

यंदा गोकुळाष्टमी चे औचित्य साधत मायराने यासाठी खास फोटोशूट केलं होतं. कान्हाची छोटी राधा ही सगळ्यांनाच आवडली. इतकच नाही तर परी मुंबईमधील दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान देखील गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी जल्लोषात सहभागी झाली होती.
यावेळी मायराच्या मालिकेबद्दल बोलायचं झाल्यास तर सध्या माझी तुझी रेशीमगाठी या सिरीयल मध्ये नुकतीच नेहाची मंगळागौर साजरी झाली आहे. यावेळी अविनाशच नेहाचा पहिला पती असल्याच सत्य अचानक समोर आल्याने नेहा आणि यश यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. नेहा आता यातून कसा मार्ग काढते हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment

Close Visit uttamsheti