फोटोत वडिलांसोबत दिसणारी ही छोटीशी पोर नक्की आहे तरी कोण? आता आपल्या चाहत्यांना अदाकारीने करतेय घायाळ.. ओळखले का तिला?
सोशल मीडियावर नेहमीच कलाकारांचे लहानपणीचे फोटोज् व्हायरल होत असतात. आता छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो जबरदस्त व्हायरल होतो आहे. या फोटोत एक चिमुरडी आपल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवून उभी असलेली दिसून येत आहे. सध्या ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत महत्वाचे पात्र निभवते आहे.काय ओळखलं का तिला?
फोटोत वडिलांसोबत दिसणारी ही चिमुरडी दुसरी कोणी नसून मुनमुन दत्ता आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ती बबिता जीची भूमिका साकारत आहे. ती अनेक वर्षांपासून या मालिकेत असून तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. हा फोटो अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोत मुनमुन वडिलांसोबत दिसत आहे. २०१८ साली मुनमुनच्या वडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला होता.
View this post on Instagram
दरम्यानच्या काळात बिग बॉस फेम अरमान कोहलीसोबतच्या तिच्या विस्कळीत नातेसंबंधाबद्दलही ती चर्चेत होती, जो तिच्या लिव्ह-इन पार्टनर नीरू रंधवाने काही वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यापासून फरार होता. त्यानंतर काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा सहकलाकार राज अनडकटला डेट करत आहे. राज तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. ही बातमी पसरताच मुनमुनला प्रचंड ट्रोल करण्यात आले, त्यामुळे ती चांगलीच संतापली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
मुनमुन दत्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मुनमुननं तर तिच्या डान्सच्या स्किल्सनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिनं मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याचं सांगितलं. तर बराच काळ मालिकेत मुनमुन दिसली नाही म्हणून तिनं शो सोडल्याची चर्चा सुरु होती.
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटीच्या निर्मात्यांनी शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक होण्यासाठी दत्ता यांच्याशी संपर्क साधला आहे. आत्तापर्यंत, निर्मात्यांच्या बाजूने किंवा मुनमुनच्या बाजूने कोणतेही अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान, मुनमुन दत्ता बिग बॉस 15 मध्ये सुरभी चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल सिंग यांच्यासोबत विकेंड का वार भागांपैकी एका भागाच्या फायनल टास्कच्या तिकीट दरम्यान चॅलेंजर म्हणून दिसली होती.