स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता संपादन करत टी आर पी चार्ट वर हुकूमत गाजवत आहे. मालिकेची संवेदनशील कथा आणि विषय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यात अव्वल ठरली. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मात्र लवकरच ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा समोर येत आहे. दरम्यान, मालिकेतील एका लोकप्रिय कलाकराने आपलं पात्र लवकरच एक्झिट घेणार असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करून सांगितलं आहे.
या मालिकेतील लोकप्रिय पात्र एसीपी सिद्धांत आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ खिरीडची पोस्ट चर्चेत आली आहे. ज्यामध्ये त्याने या मालिकेतून लवकरच आपण निरोप घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे सांगताना तो भावूक झाला.
आपला एसीपी लूक मधील फोटो शेयर करत त्याने भावूक करणारे कॅपशन त्याने लिहिले… “मुलगी झाली हो’या मालिकेतील एसीपी सिद्धांत या भूमिकेला ऑफिशियली निरोप देतोय. ज्या पात्रांनं मला लोकांचं अपार प्रेम आणि आनंद दिला. माझ्या भूमिकेने या मालिकेतून एक्झिट घेऊन दोन महिने झाले झाले. पण जेव्हा मी याबाबतचे मेसेज, कमेंट्स आणि पोस्ट वाचतो तेव्हा मला छान वाटते. ही भूमिका नेगेटिव्ह असली तरी लोक या भूमिकेला अजूनही मिस करतायेत हे पाहून कौतुक वाटतं.
View this post on Instagram
स्टार प्रवाह आणि पॅनोरोमो एंटरटेनमेंट यांनी मला ही संधी दिली त्याबदल त्यांचे धन्यवाद. लेखक, दिग्दर्शक, डीओपी, प्रकाश दादा, स्पॉट दादा, वेशभूषा, माझे सर्व स्क्रीन कलाकार, प्रेक्षक, फॅन पेज आणि प्रोजेक्टी जोडल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद…. एसीपी सिद्धांत भोसलेचा अखरेचा नमस्कार”, असे सिद्धांत खिरीडने यात म्हटले आहे.
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘कुठे पोहोचण्यासाठी कुठून तरी निघणे गरजेचे आहे’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘कृपया लवकरच काहीतरी नवीन घेऊन आम्हाला भेटायला ये… वाट बघतोय तुझी… मिस यू….लव्ह यू सो मच’ असे नेटकरी म्हणाला.
त्याने साल २०१८ मद्धे झी मराठी वरील ‘जाडूबाई जोरात’ या मालिकेद्वारे त्याने कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने झी युवा वरील ‘फ्रेशर्स’ आणि सोनी मराठी वरील ‘एक होती राजकन्या’ या मालिकेंमद्धे कामं केली होती. ‘एक होती राजकन्या’ या मालिकेत देखील त्याने पोलीसाची भूमिका साकारली होती. आणि आता तो आपल्याला मुलगी झाली हो मालिकेत ACP सिद्धांत भोसले साकारताना दिसत आहे.