अभिनेत्री करिश्मा कपूरचं नाव नव्वदच्या दशकामधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतलं जातं. करिश्माच्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा रंगत असतात. अभिनेत्रीने संजय आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. काय केला खुलासा करिश्माने जाणून घ्या..
९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने आणि अजोड अशा सौंदर्याने करिश्मा कपूर हिने लाखो चाहत्यांच्या मनात लोलो म्हणून ओळख बनवली आहे. करिश्माने ९० च्या काळात बॉलिवूडमधील बऱ्याच आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले होते. अनेकांना वाटत होते की तिचे लग्न एखाद्या अभिनेत्यासोबतच होईल. पण अनेक चाहत्यांच्या स्वप्नांवर घाला घालत २००३ मध्ये करिश्माने अभिनेता अभिषेक बच्चन सोबतचं लग्न मोडल्यानंतर लोलोने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. पण लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले.
करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. करिश्माचं हे प्रकरण बरंच चर्चेत राहिलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार करिश्माने तिच्या याचिकेमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता.
सासरी छळ होत असल्यामुळे करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. अनेक वर्ष दोघांचं प्रकरण कोर्टात सुरु होतं. संजय मला प्रचंड त्रास देत असल्याचं करिश्माने याचिकेत म्हटलं.
करिश्माने तिच्या याचिकेत म्हटले होते की, संजय तिला खूप त्रास देत असे. करिश्मा जेव्हा गरोदर होती तेव्हा संजय तिच्यासाठी एक ड्रेस घेऊन आला.
करिश्माला तो ड्रेस परिधान करण्यास संजयने सांगितलं.पण करिश्माला हा ड्रेस शोभून दिसत नसल्याने संजयने तिला विचित्र वागणूक दिली. यावेळी करिश्माच्या कानाखाली मार असं संजयने त्याच्या आईला सांगितलं.गरोदरपणातच करिश्माला अशा अनेक विचित्र गोष्टींचा सामना करावा लागला. अखेरीस २०१३ मध्ये दोघांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला.
घटस्फोटानंतर संजयने प्रिया सचदेवशी पुन्हा लग्न केले तर करिश्मा अजूनही अविवाहित आहे. करिश्माला संजय कपूरपासून दोन मुले आहेत.करिश्माच्या मुलीचे नाव समायरा कपूर आणि मुलाचे नाव कियान कपूर आहे. करिश्माची दोन्ही मुलं तिच्यासोबतच राहतात.
मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे म्हणून संजयने खार येथील घर करिश्माच्या नावावर केले आहे. तसेच दर महिन्याला लाखो रुपये संजय कपूर मुलांच्या खर्चासाठी करिश्माला देतो. रिपोर्ट्सनुसार, जवळपास १० लाख रुपये तो देत असल्याचे म्हटले जाते. त्याने मुलांसाठी १४ कोटी रुपयांचा बाँड केला असल्याचे म्हटले जाते. वर्षातून दोन महिने तो मुलांसोबत घालवतो.Mother-in-law and husband physically harassed her after marriage.. Actress Karishma Kapoor