झी मराठी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेला निरागसपणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधण्यात अव्वल असणारी सर्वांची लाडकी परी अर्थात चिमुकली मायरा वायकुळ ही तिच्या गोंडस अभिनयाने सर्वांनाच भुरळ घालत असते. मालिकेमध्ये तिने तिचं अभिनय कौशल्य आपल्याला दाखवत सर्वांना मालिका पाहण्यास भाग पाडते. यासोबतच सोशल मीडियावरही तिचे फॅन फोलोईंग जबरदस्त आहे. सध्या तिचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
सध्या मायरा सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. ती तिच्या कुटुंबियांबरोबर माऊंट अबूला फिरायला गेली आहे. त्यावेळेचा मायराचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यामध्ये मायरा तिच्या कुटुंबासोबत गाडीमध्ये बसलेली आहे. तर त्यांच्या गाडीच्या समोरच्या दोन्ही आरशांवर एक एक माकड आणि गाडीच्या टपावर एक मोठं माकड बसलेलं दिसत आहेत. मायराला हे बघून फार मजा येत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. माकडांना पाहून ती खूप खुश झाली आहे.
त्यांच्या गाडीवर माकडांनी अतिक्रमण केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धूम माजवत आहे. पण माकड आपल्या गाडीच्या काचेसमोर आणि टपावर बसलेली असताना माहेराची रिअॅक्शन पाहून अनेक चाहत्यांनी या व्हिडीओ वर अतिशय क्युट अशा कॉमेंट केल्या आहेत.
दरम्यान,सोशल मीडियावर तिच्या डान्सचा एक व्हिडीओ चर्चेच आहे. या व्हिडीओमधील तिच्या लूकने अनेकांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती ट्रेंडमध्ये असलेल्या ‘पतली कमरिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओमध्ये मायरासोबत तिची आणि इतर कुटंबीय सुद्धा दिसत आहेत. दरम्यान, मायराने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर छान अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये मायरा अतिशय सुंदर दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर मायराचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत मायराचे कौतुक केले आहे. एका यूजरने ‘एक नंबर परी’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘एकदम झकास’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर मायराचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.
दरम्यान,मायराबद्दल बोलायचं झालं तर तिचं युट्यूब चॅनेलही आहे. जे तिचे आई बाबा हँडल करत असतात. मायराचे क्यूट व्लॉग्स त्यावर पाहायला मिळतात. तिचे सोशल मीडियावर मिलियन्स फॉलोअर्स आहेत. लहान वयात सेलिब्रिटी झालेली ही स्टार कीड आहे.