अखेर ती आली! मोहम्मद शमीच्या लाईफ मध्ये पुन्हा एकदा प्रीतीचा बहर फुलला.

मित्रहो प्रत्येकाला लाईफमध्ये कोणीतरी हवे असते, जीवनसाथी म्हणून आपणाला कोणाची तरी गरज असतेच. आयुष्यात कधी कोण येईल काही सांगता येत नाही, मात्र आता टीम इंडिया मधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयुष्यात कोणीतरी नवीन आलं आहे आणि ही बाब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्याने हसीन जहासोबत लग्न केले होते, मात्र तिच्याशी त्याचा घटस्फोट झाला होता. पत्नी हसीन सोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो सिंगलच होता. आता मात्र त्याचे नाव एका खास व्यक्तीसोबत चर्चेत आले आहे.

 

मोहम्मदला अनेक गोष्टींचा छंद आहेत आणि तो आपले छंद नेहमीच जपतो. त्याला कार आणि बाईक्सचा खूप छंद आहे, मार्केट मध्ये नवीन मॉडेल आल्यास त्याची लगेच चौकशी सुरू होते सोबतच लक्झरी वाहन खरेदी करणे त्याच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्याच्या आनंदात गोडवा मिसळत आणखी एक स्पोर्ट्स कार आयुष्यात आली आहे, तिच्या आगमनाची जादू नक्कीच त्याच्या सुखाला द्विगुणित करून टाकेल. तिच्या सोबतच त्याचे खूपसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो अनेकांना आकर्षित करत आहेत.

आपण जाणतोच की मोहम्मद शमी सध्या क्रिकेट पासून दूर आहे, तरी त्याने एक शानदार लक्झरी स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० विकेट्सचा पराक्रम केल्यानंतर शमीने स्वतःलाच ही कार गिफ्ट केली आहे. कार दिसायला खूप सुंदर, आकर्षित असून तिचे मॉडेल देखील तितकेच उत्कृष्ट दर्जाचे आहे. ही एक लाल रंगाचे जग्वार एफ-टाइप कार आहे, ही स्पोर्ट्स कार असून ३.७ सेकंदात १०० चा वेग गाठते. या शानदार कारचे इंजिन V८ ३३१ KW आहे आणि म्हणूनच ही कार इतक्या कमी सेकंदात १०० चा वेग घेते.

कार दिसायला जशी लक्षवेधी आहे तशीच ती महागडी देखील आहे, तिची शोरूम किंमत ९८.१३ लाख इतकी आहे. ऑन रोड या कारची किंमत जवळपास एक कोटीहून अधिक आहे. या कार मध्ये ८ स्पीडपर्यंत गिअरबॉक्स आहेत. याचे इंजिन आणि याचे डिझाइन कोणालाही भुरळ घालेल असेच आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तिचे फोटो पाहताच, तिचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकजण या मॉडेलचे चाहते असून आता यामध्ये शमीचा सुद्धा समावेश झाला आहे. त्याच्या आयुष्यात तिची एन्ट्री ही खूप धमाकेदार झाली आहे.

ही कार पहिलीच आहे जी शमीच्या मालकीची आहे. ही नवीन पहिली लक्झरी कार घेतल्यामुळे शमी अतिशय आनंदी आहे. शमीकडे अनेक कार आहेत, त्याच्याकडे टोयोटा,फॉर्च्युनर,बीएमडब्ल्यू ५ सिरीज,ऑडी कार देखील आहे. तसेच शमीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने रॉयल एनफिल्ड जीटी ६५० ही बाईक दिसली आहे. मित्रहो सोशल मीडियावर शमीला अनेकांनी अभिनंदन दिले आहे, आमच्याकडून देखील त्याला अभिनंदन! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit Np online