दिवाळीचे सेलिब्रेशन सर्वत्र अगदी धुमधडाक्यात होत आहे. आणि अनेक सेलिब्रिटी पोस्ट शेयर करून दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज् शेयर करून आपल्या चाहत्यांसोबत आपले खास क्षण शेयर केले. दरम्यान, एका सेलिब्रिटीच्या पोस्टनं मात्र आज दिवाळीला अनेक चाहत्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. ही पोस्ट आहे मिलिंद गवळीची. मिलिंदने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपल्या आयुष्यातील एक भावुक आठवण शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध ही मालिका साकारुन भले लोकांचा राग त्यानं ओढवला असला तरी त्याच्या भूमिकेनं तो चर्चेत मात्र जोरदार आहे.मिलिंद सोशल मीडियावर अनेक विषयांच्या माध्यातून व्यक्त होताना दिसतो. दिवाळी निमित्तानं त्यानं लोकांना सुरक्षित दिवाळी साजरी करा हा संदेश देताना आपल्या आयुष्यातील दिवाळीची एक भावूक आठवण शेअर केली आहे. ही आठवण अर्थातच त्याच्या आईची आहे. काय लिहिलंय नेमकं मिलिंदनं त्याच्या पोस्टमध्ये… वाचा..
“घराच्या बाहेर पडताना मास्क लावायला सुरुवात करा, फटाक्यातल्या दारूच्या धुराने प्रचंड वायू प्रदूषण होतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, शहरांमध्ये वायु प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे त्यात या फटाक्याच्या दारूगोळ्यामुळे फेपड्यांचे आजार होतात, जास्ती करून लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना..
दीपावली, दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे, दिवे लावा कंदी लावा, वायु प्रदूषण करणारे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे फटाके काय वाजवतय?
View this post on Instagram
मलाही लहानपणी फटाक्यांचे फार वेड होतं, इतकं की मी पाचवीत असताना माझी आई पोटाच्या आजारामुळे केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती, माझे वडील मला घेऊन केईएम ला तिला भेटायला घेऊन गेले, दिवाळीचे दिवस होते, माझी आई बेडवर झोपली होती, मी आईजवळ गेलो, आणि तिला म्हणालो की पप्पांनी मला फटाके घेऊन दिले नाहीत तू सांग त्यांना मला फटाके विकत घेऊ ला, तीने वडीलांना सांगितलं की घरी जाताना त्या कि द्या.
या परिस्थितीत सुद्धा केइम हॉस्पिटल मधनं वडिलांनी मला फटाक्याच्या दुकानात नेलं आणि म्हणाले “घे तुला काय फटाके घ्यायचे ते”, मी फटाके घेतले पण नंतर मला या , गोष्टीचा खूप वाईट वाटलं कि माझी आई हॉरि ध्ये ऍडमिट असताना मी तिच्याकडे फटाक्यासाठी ला, आजही ते आठवलं तरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्रासही होतो”. त्याच्या या पोस्ट ने अनेकांचे डोळे पाणावले.