पुन्हा एकदा धूमधडाक्यात होणार नेहाचा पॅलेस वर गृहप्रवेश.. अविनाशच्या खेळीचा झाला उलगडा..
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ मालिका अल्पावधीत लोकप्रिय बनलेली मालिका आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि यशमध्ये दुरावा आला होता. पण आता मालिकेच्या आगामी भागात नेहाचा पॅलेसवर पुन्हा एकदा धुमधडाक्यात प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे.
अविनाशमुळे नेहा आणि यशच्या नात्यात दुरावा आला होता. अविनाशने नेहा आणि यशला फसवलं होतं. नेहाने अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य लपवण्याने यशला प्रचंड राग आला होता. पण आता यशसमोर अविनाशचा खरा चेहरा आल्याने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे. आता नेहा आणि परी पुन्हा एकदा चाळ सोडून पॅलेसवर राहायला जाणार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यातून दिसून येत आहे की आता अविनाशच्या पापाचा घडा भरला आहे. आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा यश नक्कीच देणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रोमोत दाखवण्यात येत आहे की, अविनाश रस्त्यावरून धावतो आहे तर यश त्याचा पाठलाग करतोय. या लगोपाठीच्या या खेळात अविनाश यशला चकवा देत एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये शिरतो.
त्याला शोधून यश त्याला चांगलाच चोप देतो यावर त्यांची चांगलीच खडाजंगी जुंपते. आणि यश अविनाश ला मारून तेथून खेचून घेऊन जातो. यावरून अंदाज आलाच असेल की तो नक्कीच त्याला नेहाची माफी मागायला लावणार आहे. आणि अखेर त्याच्या कारस्थानाचा डाव संपणार आहे.
दरम्यान, माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहरे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेजागी आता ‘दार उघड बये’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि यामुळेच ही मालिका बंद होणार होती. इतकंच काय तर मालिकेचा शेवट भाग देखील शूट करण्यात आला होता. मालिकेतील मुख्य कलाकारांनी भावूक होत पोस्ट्स देखील शेयर केल्या होत्या. आणि आता दार उघड ही मालिका १९ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पण चाहत्यांची नाराजी लक्षात घेता माझी तुझी रेशीम गाठ मालिकेच्या निर्मात्यांनी मालिका बंद न करण्याचा निर्णय घेतला असून मालिकेचा टाईम स्लॉट बदलला आहे. आता माझी तुझी रेशीम गाठ मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता मालिकेत आणखी कोणत्या घडामोडी होतील यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.