चाहत्यांची लाडकी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार चाहत्यांचा निरोप? या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे माजली खळबळ..
छोट्या पडद्यावर अनेक मालिका लोकप्रिय ठरतात. आणि या मालिका नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेने अगदी थोड्याच वेळात चाहत्यांच्या मनावर असे काही अधिराज्य गाजवले की मालिका संपण्याची घोषणा होताच चाहत्यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध बंड पुकारले आणि मालिका पुन्हा सुरू करण्यात आली. मालिकेतील प्रमुख पात्र निभावणारे कलाकार प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि चिमुकल्या मायरा यांच्या केमिस्ट्री ने चाहत्यांना लळा लावला आहे. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
दरम्यान, या मालिकेमध्ये नेहाच्या अकस्मात मृत्यू दाखवण्यात आला. आणि मालिकेत आला मोठा ट्विस्ट तोही नेहाच्याच डूप्लिकेट अनुष्काच्या एन्ट्री ने यानंतर देखील प्रेक्षकांनी मालिकेवर नाराजी व्यक्त केली. या आलेली ट्विस्ट मुळे मालिकेच्या कथानकाला वेगळेच वळण लागले.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रार्थना बेहेरे हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेतील शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने ‘शेवटचे काही दिवस’ असे लिहिले आहे. यात ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील ‘नेहा’च्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिची पोस्ट पाहून ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
View this post on Instagram
मालिका संपल्यानंतर “सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपणार” असं प्रार्थनाने म्हटलं आहे. तर ही पोस्ट शेअर करत मालिकेतील इतर कलाकारांनीही तिने टॅग केलं आहे. दरम्यान प्रार्थनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर “मीही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी होणार” असं या मालिकेतील अभिनेत्री काजल काटेने म्हटलं आहे. पण खरंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ बंद होणार का? याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या या मालिकेत यश आणि परी नेहाची स्मृती परत येण्याची वाट बघत आहे. एका अपघातात नेहा देवाघरी गेली असे सगळ्यांनाच वाटले होते. मात्र, अचानक ती पुन्हा सगळ्यांसमोर आली. पण, यावेळी ती नेहा म्हणून नाही तर, अनुष्का बनून आली आहे. अनुष्काला तिचा भूतकाळ आठवत नाही. अनुष्काचे वडील मेहता इंडस्ट्रीचे मालक आहेत. परंतु, त्यांनी देखील अनुष्काच नेहा असल्याचे सत्य लपवले आहे. आता अनुष्का देखील यशच्या प्रेमात पडली आहे. लवकरच तिची स्मृती परत येऊन तिला आपणच नेहा असल्याचे आठवणार आहे. आता ही मालिका खरच चाहत्यांचा निरोप घेते की पुन्हा नवा ट्विस्ट येईल हे येता काळच ठरवेल.