‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, नेहा की नेहासारखी आणखी कोणी? कोण असेल ती?

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने अल्पावधीत जितकी प्रसिद्धी मिळवली तितकाच चाहत्यांचा रोशही ओढवला. कारणही तसच होत. अत्यंत उत्कंठा वर्धक वळणावर येऊन मालिका संपवण्याचा निर्णय मालिकेच्या निर्मात्यांनी घेतला. त्यामुळे चाहते कमालीचे नाराज झाले होते. आणि अखेर चाहत्यांच्या प्रेमापुढे झुकत मालिकेचा स्लॉट चेंज करून ही मालिका सुरू ठेवण्यात आली.

पण दरम्यान,मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काय आहे का ट्विस्ट जाणून घ्या..

मालिकेत सध्या  नेहाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. चौधरी कुटुंबावर आलेलं हे संकट हा प्रेक्षकांसाठीही मोठा धक्का होता. त्यात मिथिला काकूचा अपघात झाल्याने त्यांना आपलं बाळ गमवावं लागलं. तर दुसरीकडे यश आणि नेहा यांच्या गाडीचा अपघात झाल्याने त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागल्याची भावना प्रेक्षकांमध्ये आहे. मात्र या अपघातात यश एकटाच घटनास्थळी सापडल्याने मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला आहे. गाडीतील नेहा अचानक गायब झाली आहे. त्यामुळे नेहा नक्की गेली कुठे, तिचं कुणी अपहरण केलं आहे का, तिच्या अशा अचानक गायब होण्यामागचं कारण काय असे प्रश्न उभे राहिले.

तिचा शोध घेतला पण न मिळाल्यानं तिचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट सांगितलं.नेहाच्या मृत्यूमुळे संपूर्ण चौधरी कुटुंब आणि परी पार कोलमडून गेले आहेत. अशातच नेहाची मालिकेतून झालेली एक्झिट प्रेक्षकांनाही आवडली नसून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. नेहाची मालिकेत रिएंट्री होणार असल्याचे दिसून येत आहे.पण रिएंट्री झालेली नेहा ही पहिल्या नेहापेक्षा फारचं वेगळी दिसत आहे. तिचा हा कायापालट पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. तिच्या या नव्या रुपात नेहा अगदीच  स्टायलिश दिसत आहे. त्यामुळे तिचा स्टायलिश अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.मालिकेत आलेली नेहा ही नेहाच आहे की आणखी कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे मालिकेतील आलेली ही नवी व्यक्ती नक्की नेहा आहे की दुसरीकोणी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.आता मालिकेत नेमकं काय घडणार याचा प्रेक्षकांना मुळीच अंदाज येत नसल्याने त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे पुढील कथानक पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.त्याचप्रमाणे नव्या नेहाला पाहून यश, परी आणि चौधरी कुटुंबियांची काय रिअँक्शन असेल हेही पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप