नेहा की अनुष्का यशने केला मोठा खुलासा..
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. गेल्या काही काळापासून मालिकेत अनेक छोटेमोठे ट्विस्ट येत आहेत. पण सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे नेहाचा मृत्यू आणि पुन्हा तिची अनुष्का म्हणून मालिकेत रिएंट्री.. यामुळे मालिका अधिक रंजक बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत यश आणि नेहा यांचा मोठा अपघात झाला होता. आणि याच अपघातात नेहाचा मृत्यू झालाय असा सगळ्यांचा समज झाला आहे.त्यानंतर काही दिवसात मालिकेत नेहासारख्या दिसणाऱ्या अनुष्काची एन्ट्री झाली. पण ती नेहा आहे की अनुष्का असा प्रश्न नेटकऱ्याना पडला आहे.
दरम्यान सोशल मीडियावर आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये स्वतः यश नेहा आणि अनुष्का यांच्याबाबतचे कन्फ्युजन दूर करताना उलगडा दिसतो आहे.
या मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने मालिकेच्या सेटवरील BTS व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, अनुष्का की नेहा ? तुम्हाला काय वाटतंय ? लवकरच कळेल….पाहत रहा माझी तुझी रेशीमगाठ. तर या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, प्रार्थना श्रेयसला विचारत आहे, कशी वाटतेय अनुष्का. त्यावर तो म्हणतोय, माझ्यासाठी माझी ती नेहाच आहे. तुमच्यासाठी कोण आहे? हा व्हिडीओतून श्रेयसने प्रेक्षकांना ती नेहा असल्याची हिंट दिली आहे.
दरम्यान, नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात यश आणि अनुष्काचा भाऊ मारामारी करताना दिसत आहे. मारामारी करता करता परी यशला सांगते की तू मारामारी करू नको नाहीतर मी आईकडे जाईन. त्यानंतर यश मारामारी थांबवतो. तितक्यात तिथे अनुष्का येते आणि त्यांच्यातील मारामारी थांबवते. ती तिच्या भावाला यशला सॉरी बोलायला सांगते. तितक्यात तिथून यश निघून जातो. यश आणि नेहाची थोडक्यात चुकामूक होते. ते दोघे भेटतील का?
View this post on Instagram
दरम्यान, समीरने ही नेहाला कॅफेत पाहिले आहे. तोही याबाबत तपास करण्यात जोर लावताना दिसून येतोय. एकीकडे हा गोंधळ चालु असताना दुसरीकडे सिम्मी कावेरीला परीची आई होण्यास तयार करत आहे. त्यामुळे नक्की काय होईल याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे. आता मालिकेत नेहा आणि यश यांची भेट होईल का? ती यशला ओळखेल की अनुष्का बनून त्याच्या प्रेमात पडेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आगामी भागात पहायला नक्की मिळतील.