“काय चालवलं आहे हे ? आम्हाला नेहाच हवी.. ” चाहत्यांनी पुन्हा एकदा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेवर दाखवली नाराजी
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. काही काळातच ही प्रेक्षकांची आवडती मालिका बनली. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री आणि अनोखी जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. आणि मालिकेत दाखवण्यात आलेले यश, नेहा आणि परीच्या नात्याने चाहत्यांना आपलेसे केले. लाडक्या कलाकारांना रोज पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असत. मध्यंतरी मालिका बंद होणार जाहीर झाल्यावर चाहत्यांच्या दबावामुळे मालिका पुन्हा सुरू करण्यात आली. पण दरम्यान मालिकेत आलेल्या ट्विस्ट मुळे मालिकेचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत.
यश आणि नेहा मिथिलाला भेटण्यासाठी रात्रीच यायला निघतात. पण अशातच यशच गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि त्यांचा मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. आणि तेव्हापासून ती बेतप्पा होती. या धक्कादायक ट्विस्टनंतर काही दिवस नेहा मालिकेतून गायब होती. पण आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतणार आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का म्हणून परतणार आहे.
दरम्यान प्रार्थनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सेटवरचा आहे. यात प्रार्थनाचा नवा लुक पाहायला मिळतोय. ‘नेहा की अनुष्का’ असं तिने हा व्हिडीओ पाहून लिहिलं आहे. पण हा व्हिडीओ काहीसे नाराज झाले आहेत.आम्हाला अनुष्का वगैरे नको, आम्हाला नेहाच हवी,
View this post on Instagram
अशा प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिल्या आहेत. नेहा… काय फालतुगिरी आहे यार, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. काहीही करा, पण परीला ओळखा, अशी कमेंटही पाहायना मिळणार आहे. प्रार्थना तू श्रेयस आणि मायरा म्हणजे नेहा, परी व यशवर्धन हे जर नसतील तर रेशीमगाठ कशी घट्ट होईल? तुझी कमी आम्हालाही जाणवते आहे. तुम्ही परत एकत्र या ना. सिरिअल बंद होणार म्हणून थोडं वाईट वाटलं पण परत चालू ठेवली तर असा ट्विस्ट नको.
नेहाच्या जाण्याने आमचा मुड ऑफ झाला. मालिकेत तुम्ही तिघेही पाहिजे. आणि अनुष्का नको नेहाच पाहिजे, अशी भावना एका चाहत्याने व्यक्त केली आहे.
आता चाहत्यांची अशी प्रतिक्रिया पाहून निर्माते नक्की काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आता अनुष्का मालिकेतून एक्झिट घेईल की तीच नेहा असेल यावर नेटकऱ्यांची चर्चा रंगलीच आहे. ज्याचं उत्तर आगामी भागात मिळेलच.