अखेर यश समोर आले अविनाशचे सत्य… मालिकेत येणार मोठा ट्विस्ट..
छोट्या पडद्यावरील सर्वात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका. सध्या या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. नेहा आणि यशच्या लग्नानंतर त्यांचे प्रेम आणखी फुलले पण त्यांच्या सुखी संसारात नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री झाली आणि त्यांच्या आनंदात विरजण घालण्याचे काम तो करतो आहे.
मालिकेत अविनाशने नेहाच्या घरी टिकून राहण्यासाठी खोटं बोलून फसवलं होतं. त्याने ‘मला कॅन्सर झाला आहे अन मी आता काहीच दिवस जगणार आहे’ असं नेहाला सांगितलं होतं. त्यामुळे नेहाने त्याला पॅलेसवर काम करण्यासाठी होकार दिला होता. पण नेहा अविनाशच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. अविनाश नेहा आणि यशामध्ये दुरावा आणण्याचं काम करत आहे. त्याच्या या कटात तो डावात तो लवकरच यशस्वी होणार असल्याचं चित्र दिसत आहे. .
याआधी अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं होतं. सिम्मी काकू याच गोष्टीचा फायदा घेऊन नेहाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नेहाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सिम्मीला सत्य कळल्यानंतर तरी नेहा यशला पहिल्या नवरा म्हणजेच अविनाश असल्याचे सांगणार का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. पण आता अखेर यशला सगळं सत्य समजलं आहे.
१५ ऑगस्टच्या मालिकेच्या विशेष महाएपिसोड मध्ये यशसमोर सत्य आले आहे.त्याचा एक प्रोमो व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. त्यामध्ये यशला अविनाश नेहाचा पहिला नवरा आहे हे सत्य समजलं आहे.आणि त्याला नेहाने जाणूनबुजून त्याच्यापासून सत्य लपवलं असं वाटतं. त्याला या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला आहे. या व्हिडीओनुसार, नेहा यशला अविनाशाबद्दल सगळं खरं सांगण्याचं ठरवते. ते सिम्मी काकूला समजतं.
यशलाही सत्य ऐकून खूप जबरदस्त धक्का बसतो. यश नेहाला घराबाहेर काढणार आहे. यश समजतो कि नेहाने त्याचा खूप मोठा विश्वासघात केला आहे. तो म्हणतोय, ‘नेहाने दुसरं काहीही केलं असतं तरी मी एवढा चिडलो नसतो. पण तिने माझा विश्वासघात केला आहे.’ असं म्हणून तो नेहाला घराबाहेर काढतो.
आता या मोठ्या ट्विस्टमुळे मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली आहे. आता यशला नेहाबद्दल नक्की काय समजलं आहे. तो थेट नेहाला घराबाहेर का काढणार आहे तसेच पहिल्या नवऱ्यामुळे नेहा आणि यशचा संसार विस्कटणार का? या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना येत्या भागात समजेलच..