‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये आलं नेहाच्या पहिल्या नवऱ्याचं विघ्न!

टेलिव्हिजन दुनियेतील सगळ्यांची फेवरेट मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सीरिअल मध्ये सध्या बरेचसे ट्विस्ट आणि टर्न्स सुरू झाले आहेत. विवाहा नंतर आता पॅलेसची सगळी सूत्र नेहाच्या हातात आली आहेत.

 

पण यासोबतच एक मोठे विघ्न देखील समोर आले आहे, ते म्हणजे अविनाशचं!

मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यामध्ये रोजच काहीतरी ट्विस्ट आणण्यात येतात. रसिका प्रेक्षकांना सिरीयल मध्ये गुंतवून ठेवण्यासाठी लेखक दिग्दर्शकांना हे करावंच लागतं. असंच काहीस सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत सुरू झालं आहे. नेहाचा पहिला नवरा अविनाश त्यांच्याकडे सध्या ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. हा तिच्यासाठी एक मोठा धक्काच होता! याशिवाय परीलाही अविनाश लळा लागलेला आहे.

मालिकेच्या या पुढच्या भागाचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आलेला आहे. काही दिवसांपूर्वी अविनाशने स्वतःला कॅन्सर झाल्याचं खोटं नेहाला सांगितलं आहे. नेहाचा देखील त्यावर विश्वास बसलेला आहे आणि म्हणूनच ती अविनाशला त्यांच्याकडे नोकरीवर ठेवते. पण या व्हिडीओत पुढे ती त्याला सुनावत देखील आहे, यावेळी ती म्हणते की,

“मी माणुसकी म्हणून तुला नोकरीवर ठेवलय. परी ही तुझ्या बॉसची मुलगी आहे या पलीकडे तिचं तुझं कुठलंही नातं नाही. तिच्याशी एक अक्षरही बोलायचं नाही. तिला फक्त शाळेत सोडायचं आणि आणायचं”

अविनाश यावेळी मान खाली घालून जी जी करत असतो, पण त्याचा धोकेबाजपणा चेहऱ्यावरून चांगलाच झळकतोय, त्यामुळे आता मालिकेत पुढे कोणतं वळण येणार यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेले आहेत.

नेहा आणि यशचे लग्न झाल्यानंतर अविनाश परिचा ड्रायव्हर होऊन पॅलेसच्या स्टाफ क्वार्टर मध्ये राहायला आला आहे. त्याने परीचे मन देखील जिंकून घेतल आहे. म्हणूनच नेहाच्या वाढदिवसाचा केक कापल्यावर परी नेहाला केक ड्रायव्हर काकांना देण्यासाठी जाऊया असा आग्रह धरते, यामुळे नेहा जेव्हा केक घेऊन अविनाशच्या रूमवर पोहोचते तेव्हा नेहा आणि अविनाश यांची नजरानजर होते. अविनाशला पाहून नेहाला चांगलाच धक्का बसतो.

गेल्या काही दिवसांपूर्वीच या मालिकेत निखिल राजेशिर्के या अभिनेत्याची नेहाच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत एन्ट्री झाली आहे. यापूर्वी निखिलने ‘अजूनही बरसात आहे’ या सिरीयल मध्ये ही नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यात त्याने मीराचा मित्र हे पात्र साकारले होते.

Leave a Comment

Close Visit Np online