‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत झाली समीरच्या बहिणीची एंट्री..
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका दिवसेंदिवस खूपच रंजक होत चालली आहे. मालिकेत येणाऱ्या ट्विस्ट मुळे चाहत्यांना मालिका पाहण्यात नवा उत्साह पहायला मिळतो आहे.दरम्यान, नेहाच्या जाण्याने चाहते जरी नाराज झाले होते तरी आता तिच्या रीएंट्रीने ते पुन्हा एकदा खुश झाले आहेत. या मालिकेत सध्या पुन्हा नवीन ट्विस्ट दाखल झालेले आहेत. दरम्यान, मालिकेत आता दाखवल्याप्रमाणे नुकतेच समीर आणि शेफाली डेटसाठी एका कॅफेमध्ये गेले आहेत. आणि नेमकी त्याचवेळी कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा उभी दिसते.
अर्थात नेहाची आता स्मृती गेली असल्याने ती अनुष्का म्हणूनच ती सगळीकडे जाते आहे. पण अचानकपणे नेहाला समोर पाहून समीर पुरता गोंधळून गेला आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या मागोमाग गेला पण इकडे शेफाली देखील समीरच्या अचानक जाण्याने गोंधळलेली दिसून आली.
यावेळी समीरच्या फोनवर त्याच्या बहिणीचा फोन येतो आणि तो नेमका कॉल शेफाली घेते. त्यानंतर या दोघींची भेट होते त्यावेळी शेफाली तिच्या आणि समीरच्या नात्याचा खुलासा करते. मात्र समीरची बहीण यावर चांगलीच नाराज होते आणि शेफालीने समीरला आपल्या जाळ्यात ओढले आहे, असे म्हणत ती शेफालीलाच धारेवर धरते. समीरच्या बहिणीची मालिकेत एंट्री झाल्याने समीर आणि शेफालीच्या नात्यात दुरावा येणार असल्याचे आसार दिसून येत आहेत.
माझ्या बहिणीला आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे ती तुझ्यावर चिडली अशी शेफालीची समजूत घालतो. तिला समजावत असतानाच तो त्याला नेहा दिसली हेही शेफालीला सांगतो. अर्थात ती नेहा होती की दुसरी कोणी यात तो संभ्रमात आहे.
मात्र या ट्विस्टमुळे नेहा मालिकेत परतण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पण सध्या तरी समीरच्या बहिणीची भूमिका निभावणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? तर मालिकेत समीरच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री योगिनी पोफळे हिने साकारली आहे. योगिनीने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकातही काम केले आहे. चित्रपट आणि मालिकेत काम करण्यापेक्षा तिला रंगभूमीवर काम करायला आवडायाचे.नाटकात काम करणे ही तिची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. लागीरं झालं जी या मालिकेत योगिनीने भैय्या साहबाच्या बहिणीची भूमिका निभावली होती. या मालिकेत एकत्रित काम करताना हे दोन्ही पात्र प्रत्यक्षात देखील भावा बहिणीचे हे नातं टिकवून ठेवताना दिसली आहेत. लागीरं झालं जी मालिकेमुळे योगिनीला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.