झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील यश अर्थात मराठी आणि हिंदी सिने सृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता श्रेयस तळपदे या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला पण चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करून ही मालिका लगेचच प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. यामुळे साहजिकच चाहते मालिकेच्या निर्मात्यांवर खूपच नाराज आहेत. तशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त देखील केली आहे.
दार उघड बये या मालिकेच्या येण्याने चाहत्यांची लाडकी मालिका निरोप घेणार आहे. पण जरी या मालिकेमुळे प्रेक्षकांचे आवडते कलाकार त्यांना टिव्हीवर दिसणार नसले तरी त्यांच्यासाठी श्रेयस एक कमालीची बातमी घेऊन आला आहे. ज्यामुळे चाहत्यांना हुरूप चढला आहे. दरम्यान, श्रेयस ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे.
त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, फॅमिलीचा पिक्चर, बघू फॅमिलीबरोबर. ‘आपडी-थापडी’ दसऱ्याच्या मुहूर्तावर ५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहांत! बऱ्याच दिवसांनी श्रेयसचा सिनेमा येतोय, ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सिनेमा एका छोट्या मुलीभोवती फिरतो. आपडी थापडी हा एक छोट्यांचा खेळ आहे. आपडी थापडी गुळाची पापडी, असं बालगीतही आहे. पूर्वी गावात अंगणात हा खेळ खेळला जायचा. या सिनेमात बाप-लेकीची कथा आहे. तो बाबा आहे श्रेयस तळपदे आणि आई आहे मुक्ता बर्वे. कोकणच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आकार घेतो.”
View this post on Instagram
सिनेमातली श्रेयस आणि मुक्ताची वेशभूषा पूर्ण वेगळी असलेली दिसून येत आहे. त्यांचा एकदम गावठी लुक उठून दिसत आहे. हे पोस्टर पाहून चाहते चांगलच खुश झाले आहेत सोबतच उत्सुक आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे श्रेयसच्या वाढदिवसालाच सिनेमाचा टीझर आला होता. त्यावेळी पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.’ या सिनेमात श्रेयस आणि मुक्तासोबत संदीप पाठक, नंदू माधव, खुशी हजारे, नवीन प्रभाकर असे हरहुन्नरी कलाकार स्क्रीन शेयर करणार आहेत.
दरम्यान, श्रेयस आणि मुक्ताचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.या सिनेमाची रिलीज डेट एका छोट्याश्या व्हिडिओमार्फत शेअर करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 7 ऑक्टोबरला प्रेक्षागृहात पाहायला मिळणार आहे. ‘फॅमिलीचा पिक्चर बघा फॅमिली बरोबर’ अशी खास टॅगलाईन सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.