माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप? नव्या मालिकेचा प्रोमो आला समोर, चाहते झाले नाराज..

0

झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका माझी तुझी रेशीम गाठ सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक अडचणींना पार करून अखेर नेहा आणि यश ने सुखी संसार करायला सुरुवात केली. चिमुकल्या परीसोबत गोड नात्याला अर्थ देण्याचा त्यांचा प्रयत्न पूर्ण होण्याच्या आधीच नेहाच्या पहिल्या नवऱ्याने त्यांच्या आयुष्यात एंट्री घेतली. त्याचे मनसुबे पूर्ण करायला सिम्मीने ही तितकीच साथ दिली. पण सध्या ही मालिका आपल्यात उत्तरार्धात येत आहे का ? असा प्रश्न उद्भवत आहे. याचे कारणही तसेच आहे.

मालिका बंद होणार का असा प्रश्न उपस्थित करणारा एक नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेच्या निर्मात्यावर चांगलच नाराज झाले आहेत. दरम्यान, १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या दार उघड बये या मालिकेची वेळ रात्री साडेआठची जाहीर केली आहे. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा स्लॉट बदलणार की या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. पण याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहाचा पहिला नवरा अविनाश परत आल्याने नेहाच्या आयुष्यात खूप उलथापालथ सुरू होती. त्यात परीचा ड्रायव्हर हाच नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नेहाने हे सत्य लपवून ठेवल्याचा धक्का यशबरोबरच चौधरी कुटुंबाला बसला आहे. नेहा पुन्हा तिच्या चाळीतल्या घरी गेली आहे. अर्थात हा कट सिम्मीने अविनाशच्या मदतीने रचला आहे. त्यामुळे मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे.

अजूनही मालिकेत खूप टवीस्ट असल्याने मालिका बंद करू नये अशी प्रेक्षकांची तीव्र इच्छा आहे. याचा रोष ते सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.

म्हणणं आहे. दार उघड बये या मालिकेचा प्रोमो आल्याने माझी तुझी रेशीमगाठ मालिका बंद होण्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

१७ सप्टेंबर हा दिवस माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवणारा असेल अशीही शंका आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या वेळेतच नवी मालिका दाखल होत असल्याने नेहा, यश आणि परी यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप कमेंट केल्या आहेत. ‘ही मालिका बंद करू नका’, अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर, ‘चांगला टीआरपी असूनही मालिका बंद करण्याचा मानसिकता चुकीची आहे.’ अशा संतप्त प्रतिक्रिया पाहून नक्की काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.