असा होणार ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा शेवट या दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग..

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकणारी झी मराठीवरील हटके मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’.. ही खूपच लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या लव्हस्टोरी आणि त्यांना जोडणारी छोटीशी गोंडस परी यांच्यामुळे या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग तयार झाला. त्यामुळेच मालिका नेहमीच टीआरपी चार्टवर टॉप १० मध्ये दिसून येत राहिली. मात्र आता मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. होय,लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान मालिकेच्या शेवटच्या भागाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली.. मालिकेत यश आणि नेहाची हटके अशी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या मनाला भावली. विवाहित मात्र पतीपासून विभक्त झालेली नेहा जिच्या आयुष्यात गोंडस अशी एक छोटीशी परी नावाची मुलगीसुद्धा असते. तर गर्भश्रीमंत असणारा, उच्चशिक्षित यश यांची ही हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरली.

दरम्यान,आता या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित केला जाणार हे निश्चित झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मालिका आता केवळ दोन ते तीन दिवसच सुरू राहणार आहे. अर्थातच येत्या २२ जानेवारीला म्हणजेच रविवारी या मालिकेचा महाएपिसोड असणार आहे. आणि मोठी अपडेट म्हणजे हा महाएपिसोडच मालिकेचा शेवटचा भाग असणार असल्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी शेयर केली आहे. २२ जानेवारीला रात्री ९ वाजता झी टीव्हीवर हा भाग प्रसारित जाणार आहे.

सध्या सुरू असणाऱ्या ट्रॅकनुसार नेहा आणि यशचं आयुष्य सुरळीत होऊन मालिकेचा गोड शेवट होईल असंच चित्र आहे. अनुष्काला सर्व आठवेल आणि ती परी-यशच्या आयुष्यात पूर्वीसारखी परत येईल असेच कथानक दाखवले जाईल. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहेरने मालिकेच्या शेवटच्या दिवशीच्या शूटिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती रस्त्यावर सैरावैरा धावत असल्याचे दिसते. ती यशकडे जाण्यासाठी अशी धावत असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला, यावरुनच मालिकेचा शेवटही गोड होईल असे समजले. मात्र शेवट जरी गोड होणार असला तरी प्रेक्षकांना मालिका संपतेच हेच पचनी पडत नाहीये.

दरम्यान, मालिका बंद होत असल्याने या मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकारांचे चाहते नाराज आहेत. मालिका बंद केली जाऊ नये यासाठी अनेकजण कमेंट्स करत मालिका सुरु ठेवण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान अनेकांनी आम्ही नेहा, यश आणि परीला प्रचंड मिस करणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप