‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफालीची बहिण देखील आहे लोकप्रिय अभिनेत्री.. या मालिकेत केले आहे काम..

0

सध्या मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्येआपल्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करण्यात ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील शेफाली आघाडीवर आहे. शेफालीची चुलबुली भूमिका अभिनेत्री काजल काटेने लीलया साकारली आहे. तिची ही भूमिका सहाय्यक अभिनेत्रीची असली तरीही तिने सर्व चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे. तुम्हाला माहित आहे का? काजलची बहिणदेखील अभिनेत्री आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे.काजल काटे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत अभिनय करते आहे पण तिला सगळे ओळखतात ते आताच्या तिच्या शेफालीचा सिनेइंडस्ट्रीत भुमिकेमुळेच.

तस अभिनय हा लहानपणापासूनच तिच्या जिव्हाळ्याच्या विषय होता असे तिने एकदा सांगितले होते. आणि तिच्यासोबत तिच्या बहिणीलाही अभिनयाची ओढ होतीच. काजलच्या बहिणीचे नाव स्नेहा काटे असून या दोघी बहिणींनी सोबतच सुरुवातीला नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. आई मंगला काटे यांच्या पाठिंब्याने स्नेहा व काजलच्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीची सुरवात नागपूर शहरातूनच झाली. संदीप डाबेराव यांच्या रंगरसिया थिएटर ग्रुपमधून त्यांनी सर्वप्रथम अभिनयाचे धडे गिरवले. इयत्ता तिसरीत असताना सावित्रीबाई फुले यांचे पात्र साकारून बालवयातच स्नेहाने रंगभूमीवर पदार्पण केले.

आणि त्यांनतर असच काम करत एकामागून एक कामे मिळत गेली. त्यानंतर मालिकामध्ये त्यांना छोटे मोठे रोल मिळाले. तेव्हापासूनच या दोघी बहिणींनी छोट्या पडद्यावर स्वतःची अशी वेगळी ओळख बनवली.काजलची थोरली बहीण स्नेहा काटे शेलार ही ‘स्नेहा अशोक मंगल’ या नावाने लोकप्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kate (@kajal_kate_k)

सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून ती जिजाबाईची भूमिका साकारत होती. मात्र स्नेहा प्रेग्नंट असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, स्नेहा सोबतचा एक क्युट फोटो शेअर करून तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे स्नेहावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्नेहाचा नवरा देखील प्रसिद्ध अभिनेता असल्याने सेलिब्रिटींनी त्याचेही अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील दौलतराव म्हणजेच अभिनेता ऋषीकेश शेलार हा स्नेहाचा नवरा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneha Ashok Mangal(KATE) (@sneha_ashokmangal14)

ऋषिकेश आणि स्नेहाने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत एकत्रित काम केले होते. स्वराज्यजननी जिजामाता, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका तसेच नाटकांमधून स्नेहाने अभिनय साकारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप