माझी तुझी रेशीम गाठ मालिकेत होणार नव्या पात्राची एंट्री.. केले आहे या फेमस मालिकेत काम..
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला अनेक वळणे आलेली पहायला मिळत आहेत. दरम्यान, मालिकेत नेहाचा मृत्यू झाला असून आता तिची रीएंट्री झाली आहे. पण ट्विस्ट असा की आपली नेहा आता अनुष्का बनली आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे नेहाचा स्मृतीभंश झाल्यामुळे ती कोणालाही ओळखू शकत नाहीये. पण ती अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे नेहा जी आता अनुष्का आहे ती मेहता कुटुंबात आपल्या आठवणी जाग्या करत आहे तर परी देखील आता आपली दुःख विसरत आहे. नेहाची स्मृती लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा आता प्रेक्षकांना आहे. दरम्यानच्या एपिसोडमध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. समीर आणि शेफाली हॉटेलमध्ये डेट साठी गेलेले आहेत. तिथेच समीरला नेहा दिसते. त्यामुळे नेहाला भेटण्यासाठी तो तिथून उठून बाहेर गेला मात्र त्यानंतर नेहा तिथून निघून जाते. समीर नेहाचा नक्कीच शोध घेणार त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट आता मोठ्या ट्विस्टचा पाया असणार.
मालिकेत या ट्विस्टमुळे बरीचशी पात्र एन्ट्री करताना दिसली आहेत. यात माधव अभ्यंकर यांनी देखील एन्ट्री घेतल्याने ते नेहाचा वापर करून घेत आहेत असेच चित्र सध्या तरी मालिकेतून दिसत आहे. या मालिकेत किंजलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंही असेल. ही भूमिका अभिनेत्री गीतांजली गणगेने साकारली आहे. किंजलचे पात्र थोडेसे नटखट आहे आणि ती अनुष्काला मदत करेल असाही विश्वास प्रेक्षकांना वाटतो आहे. गीतांजली गणगे हिने ही भूमिका आपल्या दमदार अभिनयाने उत्कृष्टपणे निभावली आहे. या मालिकेअगोदर ती अग्गबाई सुनबाई या मालिकेत तिने आपल्या अभिनयाच्या चुणूक दाखवली आहे. या भूमिकेमुळे गीतांजली प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. चिडीया घर या हिंदी मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
View this post on Instagram
दरम्यान, मालिकेत हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या नेहाला समीरने ओळखले आहे त्यामुळे नेहा जिवंत आहे हे त्याने हेरले आहे. त्याचमुळे तो आता पुढील भागात नेहाचा शोध घेणार आहे. मात्र नेहाची स्मृती अजूनही आली नसल्याने यश, परी आणि चौधरी कुटुंबासमोर हे एक मोठे आव्हानच ठरणार आहे. अनुष्काच्या लग्नासाठी एकीकडे मेहता कुटुंबात तयारी सुरू आहे पण ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे हे म्हणत तिचे वडील याला विरोध करताना दिसत आहेत. आता किंजल यात नेहाला कशा पद्धतीने मदत करणार याची हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व संकटातून ती नेहाला चौधरी कुटुंबात जाण्यास मदत करणार की आणखी कोणती अडचण निर्माण करणार हे आगामी भागात कळून येईलच.