स्वतःची काळजी घ्या..माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील या अभिनेत्रीची झाली सर्जरी..

छोट्या पडद्यावरील मालिकेत सर्वात महत्वाच्या असतात त्या म्हणजे खलनायिकेच्या भूमिका.. हा आता या भूमिका साकारणे तितकं सोपं नाही पण या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या निंदा रुपी कौतुकाला पात्र ठरणे म्हणजे महाकठीण काम असते. आणि हेच काम यशस्वीरित्या करतेय अभिनेत्री स्वाती देवल.. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मिनाक्षी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल आज लाडकी नाहीतर दोडकी मामी म्हणून लोकप्रियता मिळवली आहे.

दरम्यान,स्वातीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आले आहे. तिच्यावर रविवारी एक सर्जरी झाली आहे. याची माहिती तिने स्वतः तिच्या सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swati Deval (@swati.deval)

या बाबतीत सांगताना तिने फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्याचबरोबर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते, ” नमस्कार मित्रांनो, कालच एक छोटी सर्जरी झाली माझी…. आता मी ओके आहे… स्वामींची कृपा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचे प्रेम ह्यामुळेच हे शक्य झाले.. स्वामी दत्त कृपा तर वेळोवेळी मिळते मला. पण विशेष म्हणजे ह्या वर्षी जाणते, अजाणते पणी खूप लोकांचे मनापासून आशीर्वाद मिळालेत.. हे ते पुण्य अस कामी येत. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त १ आठवडा काळजी घ्यायची आहे.. बास. पण तरीही मी ओके…”

पुढे ती म्हणते, ‘पण खरच आपणच आपल्या शरीराची काळजी, परवा केली पाहिजे, दुर्लक्ष करू नका. वेळच्या वेळी उपचार करायला हवे. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे. पूर्वी जंक फूड म्हणजे घरी आई बनवायची रोजच्या जेवणा व्यतिरिक्त ते. म्हणजे फक्त रविवारी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी वागिरें. पण हे सगळं घरीच बरं का! आजही लोक घरी बनवायचा कंटाळा करतात.बाहेरून आणतात.

मोठे झालो अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंट मधले पदार्थ मित्र मैत्रिणीबरोबर चाखायची सवय लागते.. आणि मग ती जात नाही. कधीतरी ओके.. पण चटकदार खायची जिभेची सवय जाउचंशकत नाही.. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करण्याचा कंटाळा कसला हो..मी आजही शूट ला स्वतः डबा नेते. पण मी प्रचंड फुडी असल्याने विविध रेस्टॉरंट मधले पदार्थ खाऊन ते घरी प्रयत्न करण्यासाठी तिथल्या वेटर ना भेटून विचारून यायची सवय. त्यामुळे हे सगळं… बरं जेवणाच्या वेळा फिक्स नाहीत म्हणूनही झाले.. आणि कुठे थांबायचं, शरीरचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वतःला समजयला हवं.

तिला या परिस्थीतीत पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही तिची चिंता होता आहे. तिने लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी ते प्रार्थना करत आहेत, तसंच तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

 

Leave a Comment

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप