मराठमोळी अभिनेत्री पूर्वा गोखलेची आई सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या खास माहिती..
मित्रहो पडद्यावर अनेक कलाकार झळकत असतात, त्यांच्या खूपशा भूमिका नेहमीच भेटीस येत असतात. शिवाय पडद्यावर विविध कलाकारांसोबत त्यांचे वेगवेगळे नाते जोडले जात असते. कथेत जसे नाते असेल तसे नाते त्यांच्या मध्ये निर्माण होते त्यामुळे प्रेक्षक मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्याबद्दल खूप कमी जाणून असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हायरल होणारे फोटो पाहून आपणाला त्यांच्या फॅमिली बद्दल माहिती मिळते, मित्रहो आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहे जी पडद्यावर अनेक भूमिकेतून समोर आली आहे.
अनेक हिंदी आणि मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात गाजलेली अभिनेत्री पूर्वा गोखले खूप लोकप्रिय आहे, “कुलवधू” मालिकेतून तिला तिला खूप ओळख मिळाली आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती विशेष म्हणजे तिची आई सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव कांचन गुप्ते असे आहे, आजवर कांचन यांनी अनेक मराठी नाटकात काम केले आहे. त्यांच्या खूपशा भूमिका पडद्यावर प्रसिद्ध झाल्या आहेत. एक कलाकार म्हणून त्यांनी आजवर अनेक मालिका गाजवल्या आहेत.
“माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत देखील काम केले आहे, ही मालिका पडद्यावर प्रचंड गाजली आहे. यातून त्यांची सुद्धा विशेष ओळख बनली आहे. “घाडगे आणि सून” , “जावई विकत घेणे आहे” यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. कांचन सध्या स्टार प्रवाह वरील “तुझेच गीत मी गात आहे” या मालिकेत अभिनय करत आहेत. कांचन सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. खूपसे नेटकरी त्यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स देत असतात.
कांचन यांची मुलगी पूर्वा देखील अतिशय सुंदर दिसते, अनेक चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. खूपशा हिंदी आणि मराठी कलाकारांसोबत तिने भूमिका निभावल्या आहेत. सोशल मीडियावर पूर्वा खूप सक्रिय असते, अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. “कुलवधू” मध्ये तिची भूमिका विशेष चर्चेत आली होती. तसेच काही चित्रपटातील तिच्या भूमिका सुद्धा सोशल मीडियावर सतत चर्चेत येत असतात. त्यामुळे एक कलाकार या नात्याने तिने रसिकांशी आपले नाते नेहमीच घट्ट बनवले आहे.
कांचन आणि पूर्वा या मायलेकींची जोडी खूप लोकप्रिय आहे, कांचन यांनी देखील आपली कला उत्तम जपली आहे. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षक मंडळी खुप पसंत करतात. अशी लोकप्रियता त्यांना नेहमीच मिळत राहो ही सदिच्छा. पूर्वा आणि कांचन दोघींच्याही भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.