“..आता एक काय दोन दोन मिळाल्या तरीही रडतो..” मानसी नाईकने कमेंट करत प्रदिपला दिला टोमणा..
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खासगी आयुष्यामुळं चर्चेत आलेली मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर वर्षभरातच तिनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत मानसीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं मान्य केलं होत. त्यानंतर या दोघांचा आरोप प्रत्यारोपाचा खेळ चालूच आहे.
मानसीनं घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर त्यामागचं कारण काय असावं, हा भलामोठा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यानंतर तिनं स्वत:हून यामागचं कारण सांगितलं. प्रदीपनं तिच्यासोबत फक्त पैशासाठी लग्न केल्याचे आरोप केले तर प्रदीपनं ते खोटे ठरवत आपण ऐकतो ते सगळं खरं नसतं असं म्हणत आपल्यावर विश्वास ठेवण्याची विनंती केली.
या आधी ते दोघेही इन्स्टाग्राम पोस्टमधून एकमेकांवर आरोप करत होते. त्यानंतर ते नाट्य रिल्समध्ये बदललं. मानसी आणि प्रदीप यांनी इन्स्टाग्राम रिल्समधून एकमेकांवर आरोप केले होते. प्रदीपनं काही दिवसांपूर्वी एक रिल्स व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तो रडताना दिसतोय. आता या व्हिडिओवर मानसीनं त्याला सुनावलं आहे.मानसीनं अशी काही पोस्ट शेअर केलीये, त्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
एक नाही तर, आता दोन दोन मुली भेटल्या आहेत. आणि रडण्याच्या अॅक्टिंगसाठी ५० रुपये कापा. हा मुलगा पार्टी करत असतो आणि रिल्समध्ये रडत असतो. खोटं प्रेम. सहानुभूती पाहिजे तर मी दिली असती, ते पण फुकटमध्ये. जसं फुकट खाल्लंस, वापर केला तसं… असं थेट मानसीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदीपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, ‘मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टींवर नीट नजर ठेवून असतो.’ त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर इन्स्टाग्राम युजर्सनी कमेंट्स केल्या होत्या. यासोबतच प्रदीप आणि मानसीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील रोमँटिक पोस्ट्स डिलीट केल्या आहेत.
दरम्यान एका मुलाखतीमध्ये मानसीने प्रदीपवर काही खळबळजन आरोप केले होते. तिने असे म्हटले होते की, काही लोक फक्त प्रसिद्धी तसंच पैसा मिळवण्यासाठी एखाद्याशी नातं जोडतात. पैसा आणि प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात आणि ते त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतात. अभिनेत्री असं सांगत पुढे म्हणाली की तिच्यासोबतही हा प्रकार घडला. याशिवाय मानसीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचीही माहिती यावेळी दिली.