‘मला पुन्हा प्रेम करायचंय’! घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर मानसी नाईक..
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने भुरळ पाडत चाहत्यांना आपलेसे करत आज आपली वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक… मानसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. कधी डान्स, कधी तिचे डान्स नंबर, कधी चित्रपटामुळे ती नेहमीच चर्चेत असते.पण आता ती एका वेगळ्याच कारणासाठी नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आणि ती चर्चेत येण्याचे कारण सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा…
गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या कौटूंबिक वादाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होत होत्या. त्यावरुन चाहत्यांमध्ये अगदी गहन चर्चाही सुरु झाल्या होत्या.मानसीनं स्वतःहून घटस्फोटाच्या चर्चेवर पडलेला पडदा उघडला आहे. आणि त्याविषयी मोठा खुलासाही केला आहे. आता घटस्फोटासाठी त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे असंही मानसी नाईकनं स्पष्टपणे सांगितलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिने पोस्ट केली रे केली की तिचा संबंध थेट तिच्या घटस्फोटाशी जोडत नेटकरी चर्चा करत आहेत.
मानसीने मराठी मनोरंजन सृष्टीत कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. सोशल मीडियावरदेखील मानसीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशातच तिच्या अशाप्रकारच्या निर्णयानं सगळ्या फॉलोअर्सलाही धक्का बसला आहे.
मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खटके उडत होते. यावरून त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, हे चाहत्यांनी हेरले होते. त्यामुळे दोघे घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर मानसीनं काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. यामुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अखेर त्यावर मानसीनंच स्पष्टपणे सांगितल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.
“होय मी घटस्फोट घेत आहे” म्हणत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे अनेक चाहते तिच्यासाठी काळजीत पडले आहेत. तर काही चाहते तिच्या या निर्णयात साथ देत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मानसी आणि प्रदीप यांनी लग्न केलं. लग्नानंतर मानसीने सोशल मीडियावर त्यांचे काही काही खास फोटोज् शेयर केल्या होत्या. ज्यावरून ती खुश आहे हे साफ कळत होत. पण आता मात्र अवघ्या दीड वर्षात दोघांमधील नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचे चाहत्यांना देखील नवल वाटले आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर वेगवेगळया कॉमेंट्स वाचण्यास मिळत आहेत. आता ती नक्की काय पाऊल उचलते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.