घटस्फोटाबाबत मानसीने केला आणखी एक खुलासा.. गंभीर आरोप करत म्हणाली “..त्याने फक्त पैशासाठी…”
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा. गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या कौटूंबिक वादाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होत होत्या. त्यावरुन चाहत्यांमध्ये चर्चाही सुरु झाली होती.मानसी नाईक नवरा प्रदीपबरोबर घटस्फोट घेत असल्याचं नुकतंच तिनं सांगितलं.आता तिने एका मुलाखतीत पती प्रदीप खऱेरापासून घटस्फोट घेण्याचं खरं कारण सांगितलं असून त्याच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.ज्यामुळे चाहते अवाक झाले आहेत.
आता घटस्फोटासाठी त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे असंही मानसी नाईकनं स्पष्टपणे सांगितलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मानसी आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा हा ट्रेंडिंगचा विषय होता. मराठी मनोरंजन विश्वामध्ये मानसीनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा गेल्या वर्षीच म्हणजे २०२१मध्ये जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. त्यापूर्वीही ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते. पण लग्नाच्या वर्षभरातच अस काय झालं की दोघांना हा निर्णय घ्यावा लागला? अशा अनेक चर्चा होत आहेत.घटस्फोट घेणार असल्याचं मानसीनं सांगितल्यानंतर याचं कारण काय असावं? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता. आता या सर्व चर्चेवर मानसीनं पडदा टाकला आहे. प्रदीप खरेरावर गंभीर आरोप करत तिनं घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मानसीनं पहिल्यांदा घटस्फोटाच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.
ती म्हणाली, ”माझ्या घटस्फोटाबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. घटस्फोटासाठी अर्ज दिलाय”असं मानसीनं सांगितलं होतं.आणखी एका मुलाखीत आता मानसीने घटस्फोटाचं कारण सांगताना तिनं प्रदीपबद्दल मोठा खुलासा केला आहे.प्रदीपवर गंभीर आरोप करत मानसी म्हणाली की, ”काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळतेय तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतातात. असंच काही तरी माझ्यासोबत झालं.”तसंच ती म्हणाली, ”सध्या यावर जास्त बोलता येणार नाही, पण बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या लवकरच सर्वांसमोर आणायच्या आहेत” असंही मानसीनं स्पष्ट केलंय.
मानसी प्रदिपविषयी बोलताना पुढे म्हणाली कि, ”घटस्फोटोंच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण मला विचारत आहेत, की, लग्नकरण्यापूर्वी तुला माहीत नव्हतं का तो कसा आहे? तुला कळलं नाही का केव्हा. त्यांना मी हेच सांगेन की, लग्नापूर्वी आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो. करोना लॉकडाऊनच्या काळात आम्ही एकत्रच होतो. तेव्हा सगळेच एकमेकांशी चांगले वागत होते, असं मानसी म्हणाली.