“गद्दारांना ठोका! ठाकरे ब्रँड वाचवा!” एकनाथ शिंदे पुन्हा चर्चेत…शिवसेना अडचणीत..पोस्टर मनसेच..!

मित्रहो राजकारणीय वातावरण सध्या निराळ्याच वळणावर येत आहे, सोशल मीडियावर अनेक प्रश्नांना उधाण येत आहे. शिवसेनेचे काय होणार? एकनाथ शिंदे आता काय करणार? उद्धव ठाकरे आता राजीनामा देणार का? महाविकास आघाडीचं आता सरकार पडणार का? यांसारख्या अनेक प्रश्नांसोबत  महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा चर्चानी रंगला आहे. प्रत्येक गल्लीत, चाळीत, कोपऱ्यावर लोक चर्चा करत आहेत. हा राजकीय भूकंप हादरे देत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली सह ठाण्यात देखील पोस्टरबाजी होत आहे, त्यामुळे सर्वत्र प्रश्नांची रांगोळी काढली जात आहे. दरम्यान नागपुरात शिवसेनेच्या समर्थनात बॅनर लागल्याचे दिसून येत आहे, तसेच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार या आशयाचे देखील बॅनर लागलेले दिसत आहे. त्यातच या सर्व राजकीय धामधुमीत कोकणातून लावलेला बॅनर लक्षवेधी ठरत आहे. विशेष आश्चर्य म्हणजे असे आहे की ह बॅनर ना शिवसेनेने लावला आहे ना एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी लावला आहे.

हे दोघेही बाजूला जाऊन, लक्ष वेधून घेत असलेले हे बॅनर चक्क मनसे कडून लावण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी हा बॅनर लावून सर्वानाच थक्क केले आहे. “कोकणची भूमी निष्ठावंत, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा” हा असा बॅनर त्यांनी लावला आहे. बॅनरचा हा आशय प्रचंड चर्चेत आला आहे. या बॅनरने रत्नागिरी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे वैभव खेडेकर यांनी लावलेल्या या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो लावला नाही, शिवाय यावर “कोकणची भूमी निष्ठावंत, गद्दारांना ठोका”

हे ठळक सफेद अक्षरात लिहले आहे, तर “ठाकरे ब्रँड वाचवा” हे ठळक भगव्या अक्षरात लिहलं आहे. त्यामुळे या बॅनरचा रंग आणि रंगवलेली अक्षरे अनेक प्रश्न गोळा करत आहेत. तसेच अनेकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. आजवर कोकणातील पाच आमदारांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे, यामध्ये राजगड मधील अवघ्या तिन्ही आमदारांचा समावेश आहे. तसेच पालघर मधील एक आमदार तर सिंधुदुर्ग मधील दोन पैकी एक आमदाराचा समावेश आहे.

या पाच आमदारांमध्ये  १) महेंद्र दळवी :- अलिबाग २) महेंद्र थोरवे :- कर्जत ३) भरत गोगावले :- महाड ४) श्रीनिवास वनगा :- पालघर ५) दीपक केसरकर :- सावंतवाडी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र सध्या गुवहटीला केले आहे. तिथे शिवसेनेच्या आमदारांचा आजचा तिसरा दिवस आहे. गुवाहटीच्या ब्लु रेडिसन हॉटेलमध्ये ५० हुन अधिक आमदार आहेत. आता यापुढे आणखी कोणता विषय सोशल मीडियावर व्हायरल होईल यासाठी अनेकजण उत्सुकता लावून बसले आहेत. तर मित्रहो तुमचे यावर काय मत आहे ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Leave a Comment

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप