नमस्कार, मित्रहो छोट्या पडद्यावर अनेक मालिका मनोरंजन करत असतात, त्यांच्या कथानकातून रसिक मंडळी या मालिकांकडे विशेष आकर्षक होतात. तसेच यातील कलाकार मंडळी देखील आपल्या अभिनयातून नेहमीच पडद्यावर झळकत असतात. हल्ली मराठी मालिका देखील दिवसेंदिवस लोकप्रियतेचा टप्पा गाठत आहेत, त्यांचे कथानक देखील खूप रंजक वाटते. अशीच एक मालिका “मन उडू उडू झालं” देखील दिवसेंदिवस रसिकांच्या मनात घर निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रेमकथा सोशल मीडियावर सुद्धा चर्चेत येत आहे. शिवाय मालिकेतून खूपसे नवखे कलाकार आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहेत.
सध्या “मन उडू उडू झालं” मालिकेत अनेक ट्विस्ट येत आहेत, नुकताच सानिकाने कार्तिक सोबत लग्न केले आहे. हे लग्न घरच्यांना कळावे यासाठी तिचे प्रयत्न देखील दिसून येत आहेत. अनेक कृतीतून ती आपल्या व कार्तिकच्या लग्नाची बातमी कळवत आहे. इतकेच नव्हे तर तिने आता प्रेग्नंट असल्याचे देखील नाटक करत आहे. असे केल्याने घरची मंडळी त्यांच्या लग्नाला स्वीकारतील असे तिला वाटत आहे. त्यामुळे तिने ही कल्पना अमलात आणली आहे. मात्र तिच्या प्रयत्नांना थांबवत दिपू या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ न देण्यासाठी धडपड करत आहे.
View this post on Instagram
तसेच यामध्ये आणखी एक चकित करणारी बाब घडली आहे, सानिकाला पाहायला नुकताच अमित नावाचा मुलगा आला आहे. दिपू त्याला लग्नासाठी नकार देण्यास सांगते, त्याप्रमाणे तो सर्वांसमोर येतो पण सानिका सोबत लग्नाला नकार देण्यासाठी दिपूने सांगितले असल्याचे सांगून त्याने सर्वानाच चकित करून टाकले. प्रेक्षक मंडळी देखील यावेळी थक्क झाली आहेत, त्यामुळे यातील ट्विस्ट आणणाऱ्या अमित बद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण फार उत्सुक झाले आहेत. सोशल मीडियावर सुद्धा त्याच्याबद्दल विशेष चर्चा सुरू आहे.
यामधील अमितला साकारलेला अभिनेता आहे अनिल राजपूत, तो हिंदी व मराठी मालिकांतून पडद्यावर कार्यरत आहे. शिवाय जाहिराती क्षेत्रात देखील तो प्रचंड सक्रिय आहे. लहानपणापासून तो मुंबईतच आहे, त्याचे बालपण इथेच गेले. तसेच त्याने के.जी. जोशी कॉलेजमध्ये आणि एन. जी. बेडेकर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्याने आपल्या अभिनयाला मार्ग मोकळा केला होता, विविध नाट्यस्पर्धेत सहभागी होऊन तसेच अनेक एकांकिका सादर करून आपल्या कलेची समृद्धता वाढवली आहे.तसेच पुढे प्रेम तुझा रंग कसा, महाराष्ट्र जागते रहो यांसारख्या मालिकांतून तो छोट्या मोठ्या भूमिका करू लागला.
पिंजरा खूबसुरती का, मेरे साई यांसारख्या हिंदी मालिका मध्ये देखील त्याला संधी मिळाली. शिवाय मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या “वेड” चित्रपटात अनिलला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. २२ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये रितेशची पत्नी जेनेलिया ही मुख्य भूमिका पार पाडताना दिसणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अनिलला त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.