मालिका घेणार निरोप…”मन उडू उडू झालं” चा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार या दिवशी….

मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक मालिका भरपूर गाजलेल्या आहेत, शिवाय यातील काही भूमिका तर अशा आहेत ज्या मालिका संपल्यावर सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून असतात. त्यांच्या अबोल आठवणी वरचेवर ताज्या होत असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत नेहमीच रसिकांना उमाळा जाणवतो. झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका अशा भरपूर गाजल्या आहेत, त्यांच्या आकर्षक कथानकाने आजवर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. यातील काही मालिका सुरुवातीपासून हिट झाल्या आहेत, तर काही मालिकांनी अस्ते अस्ते आपली वठ मजबुत केली आहे.

 

दरम्यान एक मालिका अतिशय लोकप्रिय झाली आहे, या मालिकेने विशेष वळण घेतले आहे. मात्र ही मालिका अल्पावधीतच रसिकांचा निरोप घेणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतची मालिका “मन उडू उडू झालं” ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका कथेच्या अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. या मालिकेने सुरुवातीलाच सुरेख कथा रंगवली होती, यातील निरनिराळी पात्रे खूप छान आहेत. त्यांच्या अभिनयातील आणि भूमिकेतील असलेल्या वैशिष्ट्यपणा मुळे मालिका खूप रंगात असते.

मित्रहो येत्या ऑगस्ट महिन्यात आपली ही आवडती मालिका निरोप घेणार आहे, १३ ऑगस्ट रोजी या मालिकेचा अखेरचा एपिसोड आपणाला पाहायला मिळेल. आता ही मालिका निरोप घेतल्यावर पुन्हा तिच्या जागी काही विशेष भेटीस येईल का हे जाणून घेण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. आता मित्रहो याच्या जागी “तू चाल पुढं” ही नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. खास म्हणजे या मालिकेतून छोट्या पडद्यावर दीपा परब पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. यामध्ये असलेल्या कथेत एक गृहिणी खूप मोठी स्वप्ने रंगवत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepa Chaudhari (@deepaachaudhari)

यामध्ये एक गोड एकत्र कुटुंब आहे, त्यात अभिनेत्री अश्विनीला सुद्धा सहभागी करून घेतले आहे. या मालिकेतील आपल्या नवीन भूमिके बद्दल भाष्य करतेवेळी दीपा परब म्हणते की “बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना आहे. तू चाल पुढं या मालिकेच कथानक अतिशय सुंदर असून ही कथा गृहिणी असलेल्या अश्विनी भोवती फिरते आणि आपल्या कुटुंबासाठी ती काय काय करते हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधी नंतर मराठी मालिका करतेय त्यामुळे प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठींबा भरपूर मिळेल अशी मी आशा करते.

या मालिकेतील अश्विनी ही प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल, आणि अपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय आणि त्याच सोबत आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना नक्कीच जाणवेल अशी मला खात्री आहे” तर मित्रहो नक्कीच ही मालिका उत्कृष्ट कथानक घेऊन येत आहे, तुम्ही सुद्धा पहा. तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट मध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Comment

Close Visit uttamsheti