Man udu udu zhala : मालिका बंद होणार, पण कलाकार खुश.. काय आहे कारण जाणून घ्या .

0

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतून कानविंदे कुटुंबातील नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे आणि बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर यांनी मालिकेतून निरोप घेतला आहे. तसेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरणही झाल्याचेही समोर आले आहे. तसेच कलाकारांच्या तारखा किंवा कलाकारांच्या वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका ऑफ एअर जात असल्याचेही बोलले जात आहे.

नुकताच मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. इंद्रा आणि दिपूची गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेत नुकतंच इंद्रा आणि दिपूचा लग्न समारंभ साऊथ इंडियन पद्धतीने अगदी धुमधडाक्यात पार पडलं. प्रेक्षकांनी या भागाला पसंती दर्शवली होती. आता हि मालिका शेवटाकडे पोहचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिका संपताना मालिकेचे कलाकार मात्र मजा मस्ती करताना दिसत आहेत. त्याचे धमाल रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालिकेच्या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून हे व्हिडीओज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मन उडू उडू झालं मालिकेतील इंद्राचं साळगावकर कुटुंब खूपच लोकप्रिय झालं होत. या साळगावकर फॅमिलीचा धमाल व्हिडीओ अभिनेत्री प्राजक्ता परब हिने शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंद्रा दिपूच्या लग्नादरम्यानचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Umesh Parab (@prajakta_parab_official)

या व्हिडिओमध्ये संपूर्ण साळगावकर फॅमिली डान्स करताना दिसत आहे. यामध्ये इंद्रा , कार्तिक, मुक्ता, त्यांची आई तसेच सानिका आणि सत्तू हे दोघे सुद्धा डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला असून त्यांनी या पोस्टवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. पण या व्हिडिओमध्ये चाहते दिपूला मिस करत आहेत. ती या व्हिडिओमध्ये दिसत नसल्याने चाहते काहीसे नाराज झालेत . हि मालिका लवकरच संपणार असली तरी कलाकार मात्र मस्ती करत आहेत.

मन उडू उडू झालं हि मालिका पहिल्या भागापासूनच लोकप्रिय झाली होती. इंद्रा आणि दिपूची जोडी ट्रेंडिंग होती. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेला टीआरपी नसल्याने मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा बातम्या येत होत्या. पण मालिकेतील मुख्य कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे येत्या काळात इतर महत्वाच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने मालिका बंद करावी लागली. या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप