पंचतारांकित हॉटेल ते भन्नाट अभिनेत्री प्रवास करणारी ही अभिनेत्री आज गाजवते आहे छोटा पडदा, कोण आहे ती? जाणून घ्या..
सध्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्राच्या बहिणीची म्हणजेच मुक्ताची भूमिका साकारत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता परब आहे. हसऱ्या डोळ्यांची बोलकी अभिनेत्री हे विशेषण तिला लागू होते. पण तुम्हाला माहित आहे का? तिने पंचतारांकित हॉटेलमधील नोकरी सोडून अभिनयाचा हा मार्ग निवडला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना प्राजक्ताला अभिनयाचे वेध लागले. जाणून घ्या कसा होता तिचा हा हॉटेल ते अभिनेत्रीचा प्रवास…
या क्षेत्रात येण्यासाठी तिने घरच्यांकडून थोडा वेळ मागितला होता. या काळात प्राजक्ताने हळूहळू जाहिरात क्षेत्रात आपला जम बसवण्यास सुरुवात केली होती. अगदी कार्तिक आर्यनसोबत तिने एंगेज डिवोची ऍड केली होती. सेन्टरफ्रेश, महाराष्ट्र शासनाची वेस्ट नो मोअर, जिओ मार्ट अशा जाहिरातीतून तिला काम करण्याची सुवर्णसंधी मिळत गेली. पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना रजनीकांत, नाना पाटेकर या दिग्गज कलाकारांसोबत तिची चांगली ओळख झाली होती, मात्र तरीदेखील स्वतःच्या बळावरच कला क्षेत्रात येण्याचे धाडस तिने दाखवले होते. व्यावसायिक जाहिरातीमुळे प्राजक्ताला प्रसिद्धी मिळत गेली.
या व्यावसायिक जाहिरातीत काम करत असताना पुढे ललित २०५, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिका आणि माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताला महत्वाच्या भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली. मन उडू उडू झालं या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी करणार असल्याचे तिला कळले त्यामुळे त्यांच्या मालिकेत काम करता यावं म्हणून तिने या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती. त्यात तिला इंद्राच्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मुक्ता ही भूमिका थोडीशी अल्लड आहे. तिने इंद्रा आणि दिपूच्या नात्यातील दुवा बनण्याचे काम केले. भोळी, अल्लड अशी इंद्राच्या बहिणीची उत्कृष्ट व्यक्तिरेखा तिने साकारली आहे.
प्राजक्ताने तिला साजेशा दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या अंकुश मरोडे यांच्यासोबत ९ जानेवारी २०२१ लग्नगाठ बांधली. या जोडगोळीने झी मराठी वाहिनीवरील ती परत आलीये या मालिकेचे दिग्दर्शन चोखपणे केले. ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम देखील मिळाले. एक उत्कृष्ट दिगदर्शक म्हणून अंकुशने आपली जबाबदारी चोख बजावली असल्याचे या मालिकेतून दिसत आहे. अंकुशने या अगोदर हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे. असिस्टंट डायरेक्टरची भूमिका निभावत असताना त्याने सड्डा हक, लाल ईश्क, ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं या हिंदी मालिका केल्या आहेत. सात वर्षे हिंदी मालिकेत काम करत असताना एक घर मंतरलेलं या मालिकेतून त्याने मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं.
जिद्द आणि चिकाटी आपलं प्रेमचं नाहीतर कामही उत्तमरित्या करण्यासाठी प्रेरणा देते हे यांच्या जोडीकडे पाहून समजते.