वयाच्या ४८व्या वयात तरुणांनाही लाजवेल अशी भरगच्च झालेय मलायका, सिझलींग लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष…
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके स्टाईल आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूक, फॅशन स्टाईलमुले आणि तिच्या खाजगी जीवनातील घटनांमुळे चर्चेत असते.
४८ व्या वर्षीही अत्यंत फिट आणि हॉट दिसते. आपल्या अदाकारीने तिने आजवर अनेकांना घायाळ केले आहे. ती स्वतः फिटनेस फ्रिक आहे आणि नेहमीच आपले स्ट्रिकट योगा आणि डायट ती फॉलो करतेच. तिच्या कमालीच्या फॅशनमुळे आजचे अनेक तरुणी आणि नवख्या अभिनेत्री तिचा फॅशन फंडा फॉलो करताना आढळतात.
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या मलायका अरोरा मुंबईतील एका फॅशन इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक करत असल्याचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. या इव्हेंटमध्ये मलायकाने ब्लॅक कलरचा सी-थ्रू ड्रेस कॅरी केला होता. या हटके स्टायलिश ड्रेसमध्ये मलायका नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची शान बनली. आणि मुख्यतः तिला हाय हिल्स घालून रॅम्पवर चालताना पाहून प्रेक्षक अवाक झाले.मलायका अरोराने केला ब्लॅक गाऊन घालून केला शो ऑफ, डीप नेक गाऊनमध्ये केला रॅम्प वॉक या इव्हेंटचे मुख्य आकर्षण ठरले.
View this post on Instagram
चेहऱ्यावरील न्यूड मेकअप, आणि परिधान केलेल्या ब्लॅक गाऊनमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती.सोबतच तिने स्टेटमेंट पेंडेंट आणि स्टॅपी हील्सने तिचा लूक पूर्ण केला. या लूकमधील मलायकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. ‘इंडियन कॉउचर वीक’च्या चौथ्या दिवशी मलायका अरोरा हिने फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांच्यासाठी रॅम्प वॉक केला.
मलायकाच्या या मनमोहक आणि सिझलिंग फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवले आहे. तिच्या ग्लॅम लुकचे सर्वजण कौतुक करत आहेत. तिला पुन्हा एकदा अशा लूक मध्ये पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपवरून नेहमीच ही जोडी ट्रोल होत आली आहे. पण आता या ट्रोलिंग ला हाणून पाडत अर्जुन आणि मलायका यांनी लग्नबंधनात अडकण्याची निर्णय घेतला आहे. लग्नासाठी नोव्हेंबर-डिसेंबर हा गुलाबी थंडीचा काळ निवडला आहे. मलायका आणि अर्जुन कपूर ही जोडी प्रेमात आकंठ बुडालेली दिसून येते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. सात ते आठ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता त्यांच्या लग्नाची बातमी आल्याने चाहत्यांकडून त्यांच्यावर कमेंटचा वर्षाव होत आहे.