बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका दिसली हॉट लूकमध्ये.. अदा पाहून चाहते झाले घायाळ…
बॉलीवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या जोडी पैकी एक जोडी म्हणजे द मोस्ट हॅण्डसम अर्जुन कपूर आणि हॉट लूक ने सर्वांना घायाळ करणारी मलायका अरोरा..
गेल्या काही दिवसांत अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. त्यांच्या या प्रत्येक भेटीत त्यांची केमिस्ट्री तर पहायला मिळतेच शिवाय त्यांचा स्टायलिश अंदाज इतका जबरदस्त असतो चाहते नक्कीच त्यांचेकडे आकर्षित होतात.त्यांच्या या अंदाजामुळेच ते फेव्हरेट कपल्सपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाला रात्री एका पार्टीत जाताना स्पॉट केले गेले. यावेळी तिच्या लुकने सर्वांनाच स्तब्ध केले. तिचा फॅशन सेन्स इतका कुल आणि जबरदस्त आहे की तिची प्रत्येक स्टाईल ही चाहत्यांना वेडे करते. आणि यावेळी तिने अशी काही स्टाईल केली होती की कित्येक दिवसांनी अशी मलायका प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
तिचे लुक्स इतके मस्त असतात की काही मिनीटांतच तिचे लुक्स व्हायरल होतात. ग्लॅमरस कपडे, साजेशा एटीट्यूड, नखरेल अदा आणि स्वत:ला कसे प्रेझेंट करायचे याचे उत्तम ज्ञान तिच्याकडे असल्याने आजही तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सुद्धा यावेळी तिच्या सोबत होता आणि दोघांची जोडी अगदीच क्युट वाटत होती.
तर झालं असं की, मलायका आणि अर्जून कपूर दोघेही प्रोड्युस रितेश सिधवाणीने रुसो ब्रदर्ससाठी थ्रो केलेल्या स्टार-स्टडिड पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अनेक सेलेब्स उपस्थित होते आणि प्रत्येकाचा स्टायलिश अंदाज हा नजरेत भरेल असाच होता. पण या सर्वाना मागे काढले मलायका अरोराने, नेहमीप्रमाणे तिने आपल्या लुकने सर्वच अभिनेत्री आणि मॉडेल्सची लाईमलाईट हिरावून घेतली. तिने पर्पल कलरची मिनी ड्रेस स्वत:साठी निवडली होती, ज्यात तिची पूर्ण फिगर मस्त हायलाईट होत होती. जी लगेचच कॅमेरात कैद केली गेली.
तिच्या या ड्रेसचा बेस हा ब्लॅक होता, ज्यावर वॉयलेट शेडच्या रेक्टेंग्यूलर सिक्वेन्सला जोडले होते. बारीक धाग्यांनी आउटफिटवर सिक्वेन्सची हँड एंब्रॉइडरी केलेली दिसून आली. ज्यामुळे ड्रेस अजूनच जास्त स्टायलिश दिसत होता. सिक्वेन्समुळे ड्रेसमध्ये ब्लिंग इफेक्ट दिसून येत होता. शिवाय त्याची कट-आउट डिटेल त्यात उफ्फ फॅक्टर देखील अॅड करत होती. एकंदर मलायकाचा हा लुक भलताच बोल्ड आणि हॉट होता.
ड्रेसमध्ये व्हाईट स्केआर नेकलाईनसोबत स्ट्रेप्स होती, ज्यावर रेक्टेंग्यूलर सिक्वेन्स जोडला होता. शिवाय मागच्या बाजूस ड्रेसला बॅकलेस ठेवून यात दोन स्ट्रेप्स जोडले होते. ज्यामध्ये ती आपली बॅक फ्लॉन्ट करताना दिसली. बॅक पोर्शनला कंबरेपासून हेमलाईनपर्यंत आउटफिट ब्लॅक फेब्रिकमध्येच ठेवले होते. मलायकाने हे आउटफिट शॉपिंग ब्रँड THE ATTICO मधून पिक केले होते. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका आपली फिगर सुद्धा मस्त शो करताना दिसली.