अभिनेत्री आलिया भट्टचा बेबी बंप पाहून मलायका अरोरा म्हणाली, तुझी त्याने..
मित्रहो बॉलीवूड अभिनेत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. त्यांच्या फॅशन सोबतच त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी चाहत्यांना आकर्षित करत असतात. बॉलीवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री लक्ष वेधून घेत असतात. त्यातीलच फार कमी वेळात जास्त गाजलेली अभिनेत्री आलिया भट प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या अनेक भूमिका आजवर भरपूर गाजलेल्या आहेत. आलिया भट आणि रणवीर यांचे लग्न हे बॉलीवूड मधील सर्व मोठ्या थाटात पार पडलेल्या लग्न सोहळ्यांच्या मधील एक आहे. लग्न झाल्यावर अवघ्या दोन महिन्यातच अभिनेत्रीने खुश खबर दिली आहे.
आलिया आणि रणबीर लवकरच आई बाबा होणार असून पती पत्नीचे नाते आता आई वडिलांच्या जबाबदारी मध्ये रूपांतरित होणार आहे. सोशल मीडियावर हे दोघेही खूप चर्चेत असतात, त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. अलीकडे आलिया पुन्हा एका नवीन कारणावरून चर्चेत येत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ती तिच्या बेबी बंप फ्लोन्ट करण्यामुळे विशेष चर्चेत आली आहे. आजवर तिला चित्रपटात एक अवखळ, उनाड विचारांची आणि बिनधास्त तरुणी म्हणून पाहिले गेले होते मात्र आता हीच बिनधास्त तरुणी लग्नबेडीत अडकली आहे.
आलिया लग्नबेडीत अडकल्यावर लगेचच आता आई होऊन आपल्या बालपणाला मुलाच्या रुपात पुन्हा जगणार आहे. या बातमीने नक्कीच रणबीर देखील खूप खुश आहे, घरात कोणीतरी लहान पाहुणा येणार म्हणलं की सामान्य लोकांसह मोठ्या प्रसिद्ध लोकांच्या घरी देखील त्याच्या स्वागतासाठी सर्व तयारी केली जाते. आलिया आणि रणबीर सुद्धा आपल्या बाळाच्या येण्याची तयारी करत आहेत, सोबतच आलियाने आपले सिंगल फोटो बेबी बंप फ्लोन्ट करत शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक निरनिराळ्या कमेंट्स केल्या आहेत.
यातीलच एक कमेन्ट अभिनेत्री मलायका अरोरा हिची सुद्धा आहे, तिने केलेली कमेन्ट विशेष चर्चेत येत आहे. फोटो घेत असताना आलियाने रणबीर सोबत खास पोज दिल्या आहेत, यावेळी रणबीरने ब्लॅक शर्ट सोबत जीन्स परिधान केली असून आलियाने ब्राऊन कलरचा वन-पीस परिधान केला आहे. आलियाचा हा शॉर्ट ड्रेस खूप फिटिंग होता आणि म्हणून तर यातून तिचा बेबी बंप स्पष्ट दिसून येत होता इतकेच नसून आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लो देखील खुललेला जाणवत होता. यावेळी तिचे फोटो पाहून मलायकाने जबरदस्त कमेन्ट केली आहे.
अभिनेत्री मलायका लिहते की ” तुला बेबी बंप सूट करत आहे”, सोबतच तिने दुसऱ्या कमेन्ट मध्ये हृदयाचा एक आयकॉन पाठवला आहे. तिच्या सोबत अनेकांनी अशा खास कमेन्ट पाठवल्या आहेत, तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. आलियाचा ड्रेसिंग सेन्स तिच्या बेबी बंपला खुलवत असून आलिया या अवतारात सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे,त्यामुळे हे फोटो पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडले आहेत. रणबीर आणि आलियाच्या आयुष्यात आता आनंदाचा नवा प्रवाह सुरू झाला आहे, त्यांचा हा प्रवाह नेहमी असाच वाढत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.