बिग बॉस ४ होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकर अवलंबणार हा अनोखा फंडा? होणार बिग बॉसच्या घरी दंगा..
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस… सध्या या शोचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा शो केव्हा सुरू होईल याची जोरदार चर्चा रंगली आहे. हा कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणार आहे. सध्याचा हा चौथा सीझन इतर सीझनपेक्षा नक्कीच वेगळा असेल याची चुणूक शोच्या प्रोमोमध्ये पहायला मिळते आहे. या शोचा होस्ट कोण असेल यावर गेल्या काळात खूपच चर्चा झाल्या पण अखेर बाप तो बापच म्हणत हा सिझन देखील अभिनेते महेश मांजरेकरच होस्ट करणार हे प्रोमो मधून स्पष्ट झाले आहे.
महेश मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर यावेळी वेगळ्या पद्धतीनं स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. बिग बॉस मराठीचा नवा सीझन, नवं घर नवे खेळाडू असले तरी कार्यक्रमाचा होस्ट मात्र महेश मांजरेकरच असणार आहेत. सगळं नवं असल्यानं महेश मांजरेकर त्यांची चावडीवर शाळा घेण्यासाठीही नवी स्टाइल वापरणार आहेत. याची झलक त्यांनी प्रोमो मध्ये दाखवली. त्यामुळे शो पाहताना प्रेक्षकांना चौपट मज्जा येणार यात तिळमात्रही शंका नाही मांजरेकरांनी शो होस्ट करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
View this post on Instagram
बिग बॉस पाहणारे प्रेक्षक शनिवार आणि रविवारी भरणाऱ्या शाळेची आतुरतेनं वाट पाहत असतात. संपूर्ण आठवड्यात स्पर्धकांकडून झालेल्या चुका, बिग बॉसच्या घरी घातलेला राडा,गोंधळ, भांडण, एकमेकांना केलेला शिवीगाळ, सगळ्यांची शाळा मांजरेकर घेताना दिसतात. अनेकदा स्पर्धकांवर मांजरेकर प्रचंड भडकताना देखील प्रेक्षकांनी पाहिलं आहे. यावेळी ही मांजरेकरांचा हा अंदाज पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी बिग बॉस मराठी ४ चा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात मांजरेकर राग शांत करण्याचे १०१ उपायांविषयी बोलत आहेत.
या प्रोमोमध्ये मांजरेकरांच्या हातात राग शांत करण्याचे १०१ उपाय असं पुस्तकही दिसत आहे. ते म्हणतायत, ‘यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचं. चिड चिड करायची नाही’. असं म्हणून मांजरेकर मात्र प्रोमोमध्ये स्वत: हसताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे मांजरेकर खरंच शांतपणे स्पर्धकांची चावडीवर शाळा घेणार का? की त्यांचा नवा अंदाज पहायला मिळणार? या प्रश्नांचे उत्तर आता शो सुरू झाल्यावरच सर्वांना मिळेल दरम्यान प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी ४ कधी सुरू होणार? यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.