बिग बॉस मराठी सिझन ४ येणार प्रेक्षकांच्या भेटीला..पण महेश मांजरेकर नाहीतर हा लोकप्रिय अभिनेता करणार सूत्रसंचालन. कोण आहे हा अभिनेता जाणून घ्या…
Bigg Boss Marathi Season 4
छोट्या पडद्यावरील एक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ख्याती असलेला रिॲलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी.. पण हा शो तितकाच लोकप्रियही ठरतो. बिग बॉस मराठीचे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात कोण सहभागी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बिग बॉस मराठीच्या तीसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळं चौथा सीझन लगेचच येणार नाही, असं म्हटलं जात होतं. आता या चौथ्या सीझनची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानं बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, गेल्या तीन पर्वांपासून महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचे अविभाज्य भाग होते. बिग बॉस कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून महेश मांजरेकर यात ज्या अंदाजामध्ये स्पर्धकांची जशी शाळा घेतात,तो अंदाज प्रेक्षकांना कमालीचा भावतो. परंतु आता बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये महेश मांजरेकर यांच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे या सिझनचा होस्ट कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे. अशात एक नाव समोर आलं आहे.
बिग बॉस मराठी शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फक्त तीन सिझनपर्यंत असल्याचं सांगितलं. त्यामुळे चौथा सिझन कोण होस्ट करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला. नवीन माहितीनुसार अभिनेता सिद्धार्थ जाधव बिग बॉस मराठी सिझन ४ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याची शक्यता आहे.
बिग बॉस मराठी सिझन ४ चे सूत्रसंचालन करण्यासाठी सिद्धार्थचे नाव सर्वच जण घेत होते. त्यामुळे आता या सिझनचे सूत्रसंचालन सिद्धार्थ करणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सिद्धार्थ कडून याविषयी कुठलाही शिक्कामोर्तब झालेला नाही.
अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच दे धक्का २ या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला या नव्या भूमिकेत बघण्याची उत्सुकता आहे.आता तो कशा प्रकारे होस्टीग करेल याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.